Mukti Mohan Wedding: अभिनेता कुणाल ठाकूरसोबत विवाहबंधनात अडकली मुक्ती मोहन, सोशल मिडियावर फोटोज व्हायरल

Mukti Mohan Wedding: बॉलीवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. बहुतेक लग्न हे सर्वांसमोर होतात आणि चाहते देखील त्याचा आनंद घेतात. तर कधी कधी अभिनेता किंवा अभिनेत्री गुपचूप लग्न करून नंतर त्याची माहिती देतात. यामध्ये आता आणखी एका जोडीचे नाव सामील झाले आहे. प्रसिद्ध डांसर आणि अभिनेत्री मुक्ती मोहनने अभिनेता कुणाल ठाकूरसोबत लग्न केले आहे. 10 डिसेंबर रोजी अ‍ॅनिमल चित्रपट अभिनेता कुणाल ठाकूर आणि मुक्ती मोहन विवाहबंधनात अडकले. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा त्यांनी सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेयर केले. त्यांचे फोटो पाहता पाहता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले. चाहते त्यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. चला तर पाहूयात त्यांच्या लग्नाचे फोटो.

Mukti Mohan Wedding – विवाहबंधनात अडकली नीती मोहनची बहिण मुक्ती मोहन

अभिनेत्री आणि डांसर मुक्ती मोहनने आपल्या लग्नाचे फोटो (Mukti Mohan Wedding) शेयर करून त्याची माहिती दिली. तिचे लग्न अ‍ॅनिमल फिल्म अभिनेता कुणाल ठाकूरसोबत लग्न केले. मुक्तीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेतले. लग्नाची माहिती त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून मिळाली आणि चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट करण्यास सुरुवात केली.

Mukti Mohan Wedding – लग्नाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसली मुक्ती मोहन

अभिनेत्रीच्या ब्राइडल लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने लग्नामध्ये पेस्टल कलरचा लेहेंगा परिधान केला होता. भारी दागिन्यांमध्ये मुक्ती मोहन खूपच सुंदर दिसत होती. तर कुणाल ठाकूरबद्दल बोलायचे झाले तर त्याने क्रीम कलरची शेरवानी घातली होती ज्यामध्ये तो रॉयल लुकमध्ये दिसत होता. लग्नाच्या फोटोमध्ये कपल खूपच आनंदी दिसत आहे. आता लग्नाच्या वेगवेगळ्या विधींचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Mukti Mohan Wedding

मुक्तीच्या चाहत्यांनी कमेंट करून कपलला दिल्या शुभेच्छा

नवविवाहित कपल लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि त्यांच्या लग्नाच्या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. टीव्हीपासून ते चित्रपट जगतामधील बड्या व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 10 डिसेंबर रविवारी कपलने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लग्न समारंभाचे काही फोटो शेयर केले, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि मित्र परिवारातील लोक सामील झाले.

Mukti Mohan Wedding

कोण आहेत मुक्ती मोहन आणि कुणाल ठाकूर

मुक्ती मोहन ‘झलक दिखला जा’ शोची प्रसिद्ध डांसर आहे आणि बॉलीवूड अभिनेत्री असण्यासोबत ती सिंगर नीती मोहनची बहिण आहे. तिने तिच्या डांसच्या बळावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख बनवली आहे. तर कुणाल ठाकूर एक बॉलीवूड अभिनेता आहे आणि ज्याने नुकतेच अ‍ॅनिमल चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.

Leave a Comment