Anjali Arora House: वयाच्या 24 व्या वर्षी अंजली अरोराने खरेदी केले आलिशान घर, घराची किंमत जाणून होश उडतील

Anjali Arora House: ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डांस करून रातोरात फेमस झालेली अंजली अरोरा तिच्या सोशल मिडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे खूपच चर्चेत आली आहे. अंजलीने नुकतेच तिचे ड्रीम होम खरेदी केली आहे, ज्याची किंमत पाहून तुमचे देखील होश उडतील. तथापि आपण अंजलीच्या घराची झलक देखील पाहणार आहोत. ज्याचा व्हिडीओ नुकताच तिने गृहप्रवेशावेळी शेयर केला आहे.

अंजलीने दाखवली आपल्या आलिशान घराची झलक

Anjali Arora House

अंजलीने तिचे आलिशान घर (Anjali Arora House) दिल्लीमध्ये खरेदी केले आहे. ज्याची किंमत जवळ जवळ 4 करोड इतकी सांगितली जात आहे. अंजलीने आपल्या घराचे नाव अरोरा होऊस असे ठेवले आहे. ज्याचा खुलासा इने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केला आहे. अंजलीचे हे नवीन घर खूप मोठे आणि खूपच आलिशान आहे. अंजली अरोराने आपल्या कुटुंबासोबत नवीन घराची गृहप्रवेश पूजा केली. याची झलक समोर आली आहे.

Anjali Arora House – खूपच आलिशान आहे अंजली अरोराचे घर

नुकतेच अंजली अरोराने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये घराचा मुख्य हॉल स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. हॉलमध्ये सर्वजण बसले आहेत आणि पूजा सुरु आहे. अंजलीने हॉल व्हाईट आणि ब्लू थीमने सजवला आहे. शिवाय अंजलीच्या या व्हिडीओमध्ये तिच्या देवघराची देखील झलक पाहायला मिळते. अंजलीने बॉयफ्रेंड आकाश संसनवाल सोबत देखील काही फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये घराची झलक पाहायला मिळत आहे.

वयाच्या २४ व्या वर्षी अंजली बनली करोडोंची मालकीण

Anjali Arora House

अंजलीने अल्पावधीतच इतकी प्रसिद्धी आणि संपत्ती कमवली आहे. वयाच्या 24 व्या वर्षी ती करोडोच्या घराची मालकीण बनली आहे. आता तुम्ही जेव्हा अंजलीच्या घराची (Anjali Arora House) किंमत ऐकाल तेव्हा तुमचे देखील होश उडतील. अंजलीच्या या घराची किंमत जवळ जवळ 4 करोडच्या आसपास सांगितली जात आहे. अंजली आपल्या म्युझिक व्हिडीओ आणि रील्समधून जबरदस्त कमाई करते. घर खरेदी करण्यापूर्वी तिने एक लक्झरी कार देखील खरेदी केली आहे, जी तिने तिच्या आई-वडिलांना भेट दिली होती.

Also Read: शाहरुख खान आणि प्रीती झिंटानंतर आता अक्षय कुमार बनला क्रिकेट टीमचा मालक

Leave a Comment