प्रसिद्ध अभिनेत्याकडून अंकिता लोखंडेकडे शारीरिक सुखाची मागणी, अंकिता लोखंडेचा धक्कादायक

Ankita Lokhande: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील कास्टिंग काउचची शिकार बनली आहे. याचा खुलासा स्वतः अंकिता लोखंडेने केला आहे. अंकिताने सांगितले कि ती जेव्हा 19 वर्षाची होती तेव्हा तिला पहिल्यादंदा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. इतकेच नाही तर अंकिताने हे देखील सांगितले कि या घटनेनंतर ती खूपच खचली होती.

Ankita Lokhande ने सांगितला भयानक किस्सा

अभिनेत्रीने बॉलीवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काउचवर बोलताना म्हंटले कि, मी 19 वर्षाची होते तेव्हा पहिल्यांदा मला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी सांगितले गेले होते. झाले असे होते कि साऊथ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला बोलावले गेले होते. मला त्याने खोलीत बोलावले आणि म्हंटले, अंकिता मला तुला काहीतरी विचारायचे आहे. मी म्हंटले हा विचारा. तेव्हा त्याने म्हंटले कि तुला कॉम्प्रोमाइज करावे लागेल. मी त्या वयामध्ये देखील स्मार्ट होते. मी म्हंटले कशा प्रकारचे कॉम्प्रोमाइज? मला त्यांच्यासोबत पार्टीमध्ये जावे लागेल का किंवा डिनर करायचे आहे का?

Ankita Lokhande Casting Couch

दिले सडेतोड उत्तर

अंकिताने पुढे म्हंटले कि, त्या लोकांनी जेव्हा मला म्हंटले कि मला कोणत्या प्रकारे कॉम्प्रोमाइज करायचे आहे तेव्हा मी त्यांचा चांगलाच बँड वाजवला. मी त्याला म्हंटले कि, मला वाटते कि तुझ्या प्रोड्युसरला फक्त एका मुलीसोबत झोपायचे आहे. त्यांना टॅलेंटेड मुलीसोबत काम करायचे नाही आणि पुन्हा मी तिथून निथून गेले. यानंतर प्रोड्युसरने माझी माफी मागितली आणि म्हंटले कि तुम्हाला मी माझ्या चित्रपटामध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. मी म्हंटले जर तुम्ही मला मला चित्रपटामध्ये घेण्याच्या प्रयत्न जरी केला आणि मला चित्रपटामध्ये घेतले तरी मी तुमचा चित्रपट साईन करणार नाही.

खचली होती अंकिता

अंकिताने आपले म्हणणे संपवताना म्हंटले कि कि जेव्हा मी ती गोष्ट ऐकली होती कि कोणी माझ्यासोबत झोपू इच्छित आहे तेव्हा मी खचले होते. मला असे वाटले कि मी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आले आहे, जिथे लोक इतक्या सहजपणे एखाद्या मुलीला म्हणतात कि ते त्यांना तिच्यासोबत झोपायचे आहे.

हेही वाचा: दंगल गर्ल फातिमाने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव, म्हणाली; “फक्त से क्स द्वारेच…”