कपाळी टिळा, गळ्यामध्ये चुनरी देवोलीना भट्टाचार्जीने घेतले कामाख्या देवीचे दर्शन, फोटोज व्हायरल

Devoleena Bhattacharjee at Kamakhya Temple: लाडकी गोपी बहु म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee at Kamakhya Temple) नुकतेच गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. अभिनेत्रीने कामाख्या देवीच्या मंदिरातील अनेक फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती देवीच्या भक्तीमध्ये लीन झालेली दिसली. देवोलीनाने हे फोटो सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत ज्यामध्ये ती हातामध्ये गळ्यामध्ये लाल चुनरी आणि कपाळी टिळा लावलेली पाहायला मिळत आहे. पहा अभिनेत्रीचे फोटोज.

Devoleena Bhattacharjee at Kamakhya Temple

गुवाहाटीमध्य स्थित कामाख्या देवीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. कामाख्या देवीचे दर्शन करण्यासठी आणि तिचे आशीर्वाद (Devoleena Bhattacharjee at Kamakhya Temple) घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना गुवाहाटीला पोहोचली होती. अभिनेत्रीने देवीचे दर्शन केल्यानंतर मंदिरामधील अनेक फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये ती भक्तीमध्ये लीन झालेली दिसत आहे.

Devoleena Bhattacharjee at Kamakhya Temple

अभिनेत्रीने मंदिराच्या प्रांगणातील अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. तर सेल्फी देखील काढले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री खूपच खुश पाहायला मिळत आहे. तिच्या पाठीमागे कामाख्या देवीचे मंदिर देखील पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये देवोलीनाने पिवळ्या रंगाचा लॉग सूट आणि त्यावर बेज कलरचा स्वेटर घातला आहे.

सिंपल लुकमध्ये दिसली देवोलीना

यासोबत अभिनेत्रीने हातामध्ये माता राणीची लाल रंगाची चुनरी घेतली आहेत तर कपाळी टिळा आणि गळ्यामध्ये झेंडूच्या फुलांची माळ घातली आहे. फोटोमध्ये देवोलीनाने लाईट मेकअप सोबत केस मोकळे सोडले आहेत. त्याचबरोबर ती स्मित हास्य देताना दिसत आहे. अभिनेत्रीने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटो शेयर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘जय मां कामाख्या’ लिहिले आहे.

हेही वाचा: कामाख्या देवीला भूमी पेडणेकरने मागितला नवस, बहिणीसोबत भक्तीमध्ये तल्लीन झालेली दिसली अभिनेत्री