Ankita Lokhande: बिग बॉस 17 दरम्यान टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या नावाची खूप चर्चा झाली. अभिनेत्री शोदरम्यान पती विक्की जैनसोबतच्या भांडणामुळे खूपच चर्चेमध्ये राहिली. सोशल मिडियावर अनेक युजर्स हे देखील म्हणू लागले होते कि अंकिता आणि विक्कीचे नाते धोक्यात आले आहे. बिग बॉस 17 च्या या सीनचा विनर मुनव्वर फारुकी बनला आहे. अंकिता लोखाने जरी या सीजनची विनर बनली नसली तरी तिचे नशीब चांगलेच खुलले आहे. फिनालेच्या दोनच दिवसानंतर आता अंकिता लोखंडे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
Ankita Lokhande ने शेयर केली पोस्ट
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच रणदीप हुडा स्टारर ‘स्वतंत्र वीर सावरकर’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. मंगळवारी अंकिताने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेयर करून चाहत्यांना हि गुड न्यूज दिली आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले कि बिग बॉस 17 नंतर ती आता मोठ्या पडद्याद्वारे पुनरागमन करणार आहे.
अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये हा देखील उल्लेख केला आहे कि बिग बॉस 17 नंतर ती “नवीन चॅप्टर” सुरु करण्याबद्दल खूप खुश आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, इतिहासाच्या अध्यायातून हरवलेल्या नेत्याला प्रकाशात आणत आहे! BB17 नंतर एक नवीन अध्याय सुरू करणे अधिक आश्चर्यकारक वाटते. आनंद पंडित आणि रणदीप हुडा यांच्यासोबत या प्रोजेक्टचा भाग बनण्यासाठी आभारी आहे. 22 मार्च 2024 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये पाहायला विसरू नका.
विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
‘स्वतंत्र वीर सावरकर’ विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आहे. हा चित्रपट रणदीप हुडाचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे, ज्यामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट कायदेशीर अडचणीत अडकला होता. वास्तविक, रणदीप हुड्डा यांनी एक निवेदन जारी करून चित्रपटाच्या पूर्ण मालकीचा दावा केला होता. तर, महेश मांजरेकर यांनी या बायोपिकचे पहिले दिग्दर्शन केले होते. रणदीप हुड्डा यांच्या हस्तक्षेपामुळे आपण प्रोजेक्ट सोडल्याचा दावा त्यांनी केला होता.
हेही वाचा: एमी जॅक्सनने बॉयफ्रेंडसोबत केली एंगेजमेंट, स्वित्झर्लंडमधून शेयर केले रोमँटिक फोटो