“बायकोनं ५ लाखांची FD मोडली अन्…”, अंशुमन विचारेने ‘असं’ घेतलं हक्काचं घर

Anshuman Vichare: कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा शोमधून अभिनेता अंशुमन विचारे खूपच लोकप्रिय झाला. आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर त्याने मराठी दर्शकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान मिळवले आह. कोरोनानंतर अभिनेता अंशुमनने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला. सध्या तो राजू बन गया जेंटलमन या नाटकामध्ये पाहायला मिळत आहे.

अंशुमन विचारे सोशल मिडियावर देखील सक्रीय असतो. त्याचे आणि त्याच्या पत्नीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेयर करतो. त्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या पत्नीने त्याला चांगली साथ दिली. अभिनेता अंशुमनने नुकतेच एका मुलाखतीमध्ये आपल्या पहिल्या घराच्या आठवणींणा उजाळा दिला आहे.

Anshuman Vichare ने ‘असं’ घेतलं हक्काचं घर

मुलाखतीदरम्यान अभिनेता म्हणा, पल्लवी माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर माझे आयुष्य बदलून गेले. प्रत्येकजण आयुष्यामध्ये प्रगती करतो पण त्यासाठी लक फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. पल्लवी येण्यापूर्वी अनेक कामे माज्या हातामधून निसटली. पण नंतर सर्व काही व्यवस्थित झाले. आम्ही पाहिलं घर घेतलं, इतकं सुंदर घर घेऊन असं मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत. घरासाठी 8 दिवसांमध्ये 20 लाख रुपये गोळा करायचे होते. घराच्या बुकिंगसाठी पल्लवीने पाच हजार रुपये दिले होते. मी तिला म्हंटले आता ते पैसे फुकट जाणार. आपण 20 लाख रुपये कुठून आणायचे, त्यानंतर तिने एफडी मोडली होती.

यावर अंशुमनची (Anshuman Vichare) पत्नी म्हणाली कि, मी एफडी मोडून पाच लाख रुपये दिले आणि 15 लाखांसाठी मित्रांना विचार असे म्हंटले. इतरांकडून पैसे घेण्यास अंशुमन तयार नवता. मी त्याला अशा काळात तुझे खरे मित्र कोण आहेत याची कल्पना तुला येईल असं सांगितलं. त्यानंतर त्याने अनेक मित्रांना फोन लावले. त्याच्या काही मित्रांनी आम्हाला मदत केली आणि ४ ते ५ दिवसांत आम्ही २० लाख रुपये जमा केले.

बँकेकडून १५ वर्षांसाठी कर्ज मिळेल असा अंदाज होता पण नाही मिळाले. पण नंतर 10 वर्षासाठी कर्ज मिळाले. त्यावेळी 40 हजार रुपये दर महिन्याला हप्ता होता. आता हे सांगताना खूप बर वाटत कि आम्ही ते कर्ज फक्त पाच वर्षांमध्ये फेडलं. यादरम्यान पल्लवीने मला खूप चांगली साथ दिली. आता आम्ही आणखी एक घर खरेदी केलं आहे. अस देखील अंशुमन म्हणाला.

हेही वाचा: “तो सतत खोटं बोलत होता आणि…” प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ रिलेशनशिप बद्दल मोठा खुलासा