Prajakta Mali: प्राजक्ता माळी मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या कामासोबतच ती तिच्या बिजनेसमुळे देखील खूप चर्चेमध्ये असते. नुकतेच आपल्या पर्सनल लाईफबद्दल केलेले वक्तव्य चर्चेमध्ये आले आहे. तिने पाच वर्षापूर्वीच्या तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला.
प्राजक्ता (Prajakta Mali) माळीने शेयर केला किस्सा
एका मुलाखतीदरम्यान ती बोलताना म्हणाली कि, डोक्याची मंडई होणार असेल तर लग्न कशाला करायचे, मानसिक शांतता हीच माझ्या आयुष्यभरासाठी प्राथमिकता आहे. एक जोडीदार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. तुमचं रोजचं जगणं, तुमचं भविष्य तुमची आर्थिक गणितं तुमचे मानसिक आरोग्य. लग्न हि खूप मोठी जोखीम आहे.
प्राजक्ता पुढे म्हणाली कि काहींना शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक गरजा असतात, त्यांच्यासाठी लग्न सोपी गोष्ट आहे. पण माझ्या गरजा खूप कमी झाल्या आहेत. त्यामुळे गरजाच नसतील तर नाते कसं टिकणार? नातं खर असेल तर ते टिकणार. याच गोष्टी मी माझ्या आईला समजावते आहे आणि तिला देखील ते कळतंय.
प्राजक्ता ((Prajakta Mali) ने एक जुना किस्सा यादरम्यान शेयर केला. “मी कधीकधी प्रेमात पडते, पण नंतर मला कळतं की हे शेवटपर्यंत राहणार नाही, मग मी सांगते की ऐक मित्रा, सगळं छान आहे पण हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू घरी जा. (हसते) आपण थांबूया. हे मी पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं. तू खोटं बोलतोस माझ्याशी, मी तुला पकडलं आहे, हे त्याचे पुरावे आहेत. रितसर जय महाराष्ट्र करण्यात आलाय त्याला.
कारण तो सतत खोटं बोलत होता आणि ते मान्यही करत नव्हता. तुमच्यामध्ये खरं बोलण्याची हिंमत पाहिजे, कारण तीच सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. मी चुकलो हे तरी मान्य करायला हवं. त्यासाठी माफी मागून मार्ग काढायला हवा, पण नाही. सारखं खोटं बोलायचं. जो खोटं बोलतो ना तो सर्वात आधी बाद होतो,”
हेही वाचा: अभिनेत्री श्रुती मराठेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली; ‘आयुष्य पूर्ण करण्यासाठी पुरुषाची…’