Anushka Sharma Pregnant: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली आपल्या दुसऱ्या मुलाच्या स्वतासाठी सज्ज झाले आहेत अशी बातमी व्हायरल होत आहे. तथापि कपलकडून याबद्दल कोणतीही घोषणा झालेली नाही. पण वेळो-वेळी समोर येणाऱ्या अनुष्काच्या फोटोवरून तिच्या प्रेग्नंसीच्या अफवांना हवा मिळत आहे. यादरम्यान अनुष्काचा आणखी एक फोटो व्हायरल हॉट आहे, ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
अनुष्काने केली प्रेग्नंट असल्याची घोषणा? – Anushka Sharma Pregnant
नुकतेच सोशल मिडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये अनुष्का, विराट एकमेकांसोबत पोज देताना अनुष्का आपल्या बेबी बंपवर हात ठेवलेली पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने गोल्डन कलरची साडी घातली आहे. फोटो व्हायरल होताच चाहते चकित झाले आहेत कि अखेर अनुष्काने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची (Anushka Sharma Pregnant) घोषणा केली.
अनुष्का-विराटच्या व्हायरल फोटोमागील गुपित
तथापि माहिती काढल्यानंतर असे दिसून आले कि व्हायरल फोटो दोघांच्या जुन्या फोटोचे एडीटेड व्हर्जन आहे. अनुष्काने २०१८ मध्ये दिवाळीला हि गोल्डन साडी घातली होती आणि फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला होता. जुन्या फोटोमध्ये ती आणि विराट आपल्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये पोज देत होते. अशामध्ये हा फोटो फेक आहे.
अनुष्का आणि विराटच्या लग्नाचा सहावा वाढदिवस
11 डिसेंबर 2023 रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी लंडनमध्ये एक इंटीमेट बॉल पार्टी केली होती, ज्यामध्ये त्यांचे जवळचे मित्र देखील सामील झाले होते. अनुष्काने या प्रसंगी ब्लॅक कलरचा ड्रेस निव्ल्डा होता, ज्यामध्ये फ्लोई सिल्हूट आणि वरच्या बोर्डरवर स्टोन वर्क होते. तर विराटने व्हाईट स्नीकर्ससोबत ब्लॅक फॉर्मल ड्रेस परिधान केला होता.
अनुष्काने बेबी बंप लपवल्याचा नेटिझन्सनी केला दावा
पार्टीमधील काही व्हायरल फोटोमध्ये अनुष्का पती विराट किंवा इतर पाहुण्यांच्या मागे लपताना पाहायला मिळत आहे. अशामध्ये नेटिझन्सचे म्हणणे आहे कि तो लोकांपासून आपले बेबी बंप (Anushka Sharma Pregnant) लपवण्याचा प्रयत्न करत होती. रेडिटवर जेव्हा फोटो शेयर केले गेले तेव्हा नेटिझन्सनी प्रतिक्रिया देऊ लागले.
Also Read: मुलीसोबत पहिल्यांदाच दिसला राम चरण, राम चरण आणि क्लीन काराचा व्हिडीओ व्हायरल…