Ashneer Grover Net Worth: भारतपे चा को-फाउंडर अशनीर ग्रोवरची किती आहे कमाई

Ashneer Grover Net Worth: भारत पे चा पाया रचणारा अशनीर ग्रोवरने भारत पेची पाया रचण्यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांच्या उच्च पदावर काम केले आहे. त्याने कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये सात वर्षे उपाध्यक्षपद म्हणून कम केले आहे. त्यानंतर अमेरिकन एक्सप्रेसमध्ये संचालक (कॉर्पोरेट विकास) म्हणून सुमारे दोन वर्षे काम केले. ग्रोफर्समध्ये त्यांने अडीच वर्षे मुख्य वित्तीय अधिकारी पद भूषवले. ग्रोव्हर हा पीसी ज्वेलर्समध्ये नवीन व्यवसायाचे प्रमुख होता.

Ashneer Grover Net Worth

अशनीर ग्रोवर नेट वर्थ (Ashneer Grover Net Worth)

अशनीर ग्रोवरची एकूण नेट वर्थ 790 करोड रुपये (Ashneer Grover Net Worth) आहे. दिल्लीच्या पंचशील पॉश भागामध्ये अशनीरचे 18000 स्क्वेअर फुटमध्ये घर आहे. ज्याची किंमत जवळ जवळ 30 करोड रुपये आहे. अशनीर ग्रोवरवर कार्सचे चांगलेच कलेक्शन आहे. त्याच्याजवळ Mercedes Maybach S650 कार आहे ज्याची किंमत 2.5 करोड रुपये आहे. शिवाय 1 करोड 30 लाखची ग्रीन Porsche Cayman आहे. या दोन स्पोर्ट्स कार शिवाय त्याच्याजवळ Audi A6 देखील आहे. (Ashneer Grover Net Worth)

अशनीर ग्रोवरचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीमध्ये झाले. त्याने दिल्ली आयआयटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. त्यानंतर त्याने आईआईएम अहमदाबाद मधून एमबीए केले. अशनीरचे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते आणि आई शाळेत शिक्षिका होती.

नवीन स्टा र्टअप उभारण्यात व्यस्त आहे ग्रोवर

अशनीर ग्रोवर भारत-पे मधून बाहेर काढल्यानंतर एक नवीन स्टा र्टअप उभारण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याचे नाव थर्ड यूनिकॉर्न आहे. थर्ड यूनिकॉर्न ने क्रिक-पे नावाने एक फँटसी गेम लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी अशनीर ग्रोवरने एक ट्वीट करून म्हंटले होते कि या स्टार्टअपमध्ये जो देखील कर्मचारी पाच वर्षे पूर्ण करेल त्याला मर्सिडीज गिफ्ट दिली जाईल.

अश्नीर ग्रोवर कॉन्ट्रोवर्सी

Ashneer Grover Net Worth

भारतपे के को-फाउंडर अशनीर ग्रोवर आणि त्याची पत्नी माधुरी जैन यांच्या अडचणी संपण्याचे काही चिन्हे दिसत नाही आहेत. दिल्ली उच्च न्यायालयने भारतपे तर्फे ग्रोव्हर दाम्पत्याविरुद्ध दाखल केलेल्या ८१ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबीयांवर कंपनीची 81.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हा आरोप अश्नीर ग्रोव्हरला आतापर्यंत महागात पडला आहे. या आरोपामुळे त्यांना भारतपे या 21 हजार कोटी रुपयांच्या कंपनीतून बाहेर पडावे लागले. शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याला जज न बनवण्यामागे हे आरोप असल्याचे सांगितले जात आहे

हेही वाचा: 200 करोडचे घर, लंडन-दुबई मध्ये प्रॉपर्टी, जगातील चौथा श्रीमंत अभिनेता शाहरुख खानची इतकी आहे नेटवर्थ