गुगल पे, फोनपेला टक्कर देण्यासाठी बाजारात येणार TATA Pay, रतन टाटा करणार टाटा पे लाँच

TATA Pay: टाटा ग्रुपची आता पेमेंट अ‍ॅप्लिकेशनमध्ये एंट्री होणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे TATA Pay ला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एग्रीगेटर परवानाही मिळाला आहे. म्हणजेच आता कंपनी ई-कॉमर्स व्यवहार करू शकते. टाटा पे टाटा डिजिटलचा भाग आहे, कंपनीची डिजिटल शाखा आहे. याद्वारे कंपनी डिजिटल व्यवसाय करते.

2022 मध्ये टाटा ग्रुपने आपले डिजिटल पेमेंट अ‍ॅप्लिकेशन लाँच केले होते. अतापायंत कंपनी ICICI बँकेसोबत भागीदारी करून UPI पेमेंट करत होती. यासोबत कंपनी टेक्नोलॉजी बद्दल नवीन रणनीती देखील बनवत आहे. कारण आतापर्यंत कंपनीचे कंज्यूमर्स सोबत ट्रॅक्शन जरासुद्धा नाही. हा टाटा ग्रुपचा दुसरा पेमेंट बिजनेस आहे. ज्याला कंपनीकडून युज केले जाईल. कंपनीजवळ ग्रामीण भारतामध्ये ‘व्हाईट लेबल एटीएम’ चालवण्याच्या परवाना देखील आहे. कंपनीच्या या व्यवसायाचे नाव इंडिकॅश आहे.

TATA Pay ला आरबीआयकडून परवाना

RBI हा डेटा देखील दाखवते कि याआधी टाटाने प्रीपेड पेमेंट बिजनेस (मोबाइल वॉलेट) मध्ये देखील हात अजमावला आहे. पण त्यामध्ये म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. यानंतर कंपनीने 2018 मध्ये याचा परवाना सरेंडर केला. डिजिटल पेमेंट्स स्टार्टअपचे संस्थापक म्हणाले कि, पेमेंट एग्रीगेटर लाइटसोबत, टाटा सब्सिडियरी एंटीटीज सोबत सर्व ईकॉमर्स व्यवहार करू शकते आणि यामुळे निधी व्यवस्थापित करण्यातही खूप मदत होईल.

Razor Pay, Google Pay ला आधीच मिळाला आहे परवाना

Tata Pay ला देखील Razorpay, Cashfree, Google Pay आणि इतर कंपन्यांप्रमाणे दीर्घ प्रतीक्षेनंतर परवाना मिळाला आहे. PA लायसन्सच्या मदतीने कंपनीला ऑनलाइन व्यवहार करण्याची परवानगी मिळते. यासोबत कंपनी कंपनी फंड्स हाताळण्याची देखील परवानगी देते. टाटा पे व्यतिरिक्त बेंगलोर स्थित DigiO ला देखील 1 जानेवारी रोजी परवाना मिळाला आहे.