वाढलेलं वजन, सुजलेला चेहरा, 16 वर्षात इतका बदलला आयशा टाकियाचा लुक, ओळखणे देखील झाले कठीण

Ayesha Takia Look: सलमान खानच्या ‘वॉन्टेड’पासून ते अजय देवगणच्या ‘संडे’ आणि अक्षय कुमार सोबत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या क्युट स्माईल आणि दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री आयशा टाकिया (Ayesha Takia) बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे.

सोशल मिडियावर फोटो व्हायरल

Ayesha Takia

अभिनेत्री अधूनमधून कुठेतरी स्पॉट होत असते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री मुंबई विमानतळावर पाहायला मिळत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा लूक इतका बदलला आहे की तिच्या चाहत्यांसाठी तिला ओळखणे खूप कठीण झाले आहे. फोटोंमध्ये ती तिच्या मुलासोबत पाहायला मिळत आहे.

Ayesha Takia

नुकतेच आयशा टाकिया मुंबई विमानतळावर पाहायला मिळाली. जिथे ती तिचा मुलगा मिखाइल आज़मी सोबत पाहायला मिळाली. आपल्या क्युट स्माईल आणि स्टायलिश अंदाजासही ओळखली जाणारी आयशा टाकियाच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ती सिंपल लुकमध्ये पाहायला मिळत आहे. तथापि तिचा हा अंदाज चाहत्यांना खूप पसंद येत आहे.

Ayesha Takia

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आयशा टाकिया निळ्या रंगाच्या प्लाजो सूटमध्ये दिसत आहे. ज्यासोबत दुपट्टा कॅरी केला आहे. त्याचबरोबर आयशाने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे, ज्यामुळे तिच्या साधेपणात भर पडत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीला ओळखणे कठीण होत आहे.

वॉन्टेड’ चित्रपटमधून मिळाली लोकप्रियता

16 वर्षांपूर्वी आयशा टाकिया (Ayesha Takia) सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटामध्ये दिली होती. या चित्रपटामधून तिला जबरदस्त लोकप्रियता मिळाली होती आणि तिची चांगलीच फॅन फॉलोईंग वाढली होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये आयशा टाकियाच्या ट्रांसफॉर्मेशन ने चाहत्यांना हैराण केले आहे. या बदलेल्या लुकमध्ये अभिनेत्रीला ओळखणे खूपच कठीण झाले आहे.

Ayesha Takia

मुंबई विमानतळावर आयशा टाकिया तिचा मुलगा मिखाइल आज़मी सोबत पाहायला मिळाली. यादरम्यान आयशा मुलगा मिखाइल आणि तिच्यासोबत आलेल्या महिलेसोबत ती पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईलदेखील पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने हातामध्ये बॅग देखील कॅरी केली आहे.

हेही वाचा: अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला अक्षय कुमारने लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल

News Title: ayesha takia look photo viral