हिरवी साडी, नाकात नथ अन्… पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो आला समोर

Pooja Sawant Engagement: मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये सध्या लगीनघाई जोरात सुरु आहे. नुकतेच टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा उरकला आहे. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीने नुकतेच गुपचूप साखरपुडा केला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा (Pooja Sawant Engagement) थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

पूजा सावंतने केला साखरपुडा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने जोडीदारासोबतचा एक फोटो शेयर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अनेक दिवसांपासून पूजा सावंत लग्न कधी करणार? ती सिंगल आहे कि कोणाला डेट करते आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. आता अभिनेत्रीने साखरपुडा करून या प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. चाहत्यांना आता तिच्या लग्नसोहळ्याची आतुरता लागून राहिली आहे. पूजाने साखरपुड्या दरम्यान हिरव्या रंगाची पत्नी साडी, नाकात नथ, हार असा लूक केला होता तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा घातला होता.

कोण आहे पूजा सावंतचा होणारा पती

पूजा सावंत ने तिच्या जोडीदारासोबतचे फोटो शेयर करून आपल्या लग्नाची घोषणा केली होती. पूजा सावंतच्या पतीचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. माहिती नुसार पूजा सावंतचा होणारा पती हा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक आहे.

पूजा सावंत कधी करणार लग्न

लग्नाच्या मुहूर्तावर बोलताना पूजा म्हणाली कि चव्हाण आणि सावंत कुटुंबीय मिळून लग्नाच्या मुहूर्तावर निर्णय घेतील. सिद्धेशला जेव्हा त्याच्या कामामधून वेळ मिळेल त्यावेळी आम्ही लगेच लग्न करू. उखाणे घेण्यासाठी मी आता सज्ज आहे.

News Title: pooja sawant engagement photo