Bagheera Movie: प्रभास आणि यशपेक्षा देखील खतरनाक आहे ‘बघीरा’, अंगावर शहारे आणणारा टीजर रिलीज

Bagheera Movie: होम्बले फिल्म्सने भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यांनी चाहत्यांना KGF Chapter 1 आणि 2 आणि ‘Kantara’ सारखे चित्रपट दिले आहेत. अशाम्ध्य्ते आता ते आपल्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट ‘सालार पार्ट 1: सीजफायर’ च्या रिलीज साठी तयार आहेत, ज्यामध्ये प्रभास मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपट प्रशांत नीलने दिग्दर्शित केला आहे. चित्रपट 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Bagheera Movie

चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रोडक्शन हाऊसने आपल्या फिल्मोग्राफी खजान्यामधून आणखी एका रोमांचक टीजरवरून पडदा उठवला आहे. त्यांनी आपल्या आणखी एका महत्वपूर्ण प्रोजेक्ट ‘बघीरा’ (Bagheera Movie) चा टीजर लाँच केला आहे. मुख्य अभिनेता श्री मुरलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम्बले फिल्म्सने सोशल मिडियावर ‘बघीरा’ चा 1 मिनिट 26 सेकंदाचा टीजर रिलीज केला आहे.

चित्रपटामध्ये एका वेगळ्या जगाची झलक पाहायला मिळत आहे. होम्बले फिल्म्स शिवाय ‘बघीरा’ ला आणखीन रोमांचक बनवणारी बाब म्हणजे चित्रपटाचे लेखन केजीएफ चॅप्टर 1 आणि 2 आणि लवकरच रिलीज होणाऱ्या ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ दिग्दर्शक प्रशांत नीलने केले आहे.

Bagheera Movie

श्री मुरलीच्या वाढदिवशी रिलीज केला Bagheera Movie Teaser

होम्बले फिल्म्सने टीजर रिलीज करत लिहिले आहे कि, तुमच्या बघीरा चा टीजर सादर करत आहोत. आमचा ‘रोरिंग स्टार’ श्री मुरलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यासोबत त्यांनी यूट्यूब लिंक देखील शेयर केली आहे, ज्यावर लोक टीजर पाहू शकतात.

‘सालार’ रिलीजची प्रतीक्षा

‘सालार पार्ट 1 सीज़फायर’ बद्दल बोलायचे झाले तर अ‍ॅक्शन-पॅक्ड ड्रामामध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट प्रशांत नीलने दिग्दर्शित केला आहे तर निर्मिती विजय किरागांदुरने केली आहे. 22 डिसेंबर रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. होम्बले फिल्म्स कांतारा 2 मधून दर्शकांचे मनोरंजन करण्याच्या तयारीत आहे. शिवाय ‘टायसन’ देखील लाइनअपमध्ये आहे.

Also Read: ‘अ‍ॅनिमल’ मधील ‘भाभी-2’ तृप्ति डिमरीचा जबरदस्त डांस, पाहून चाहत्यांना सुटला ताबा

Leave a Comment