Bajaj Chetak Electric Scooter: बजाजने इंडियन मार्केटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Bajaj Chetak Urbane’ लॉन्च केली आहे. कंपनीच्या प्रसिद्ध चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे हे नवीन मॉडेल आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरला दोन व्हेरिएंट स्टँडर्ड आणि टेकपॅक सोबत बाजारामध्ये आणले आहे. याचे बेस मॉडेल प्रीमियम व्हर्जनच्या जवळपास असेल. कंपनीने याला अनेक अपग्रेड्ससोबत सदर केले आहे, पण यामध्ये काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.
बजाज चेतकच्या नवीन मॉडेलमध्ये सर्वात मोठी अपडेट याची रेंज आहे. सिंगल चार्जवर हे मॉडेल जास्त रेंज देईल. ब्रेकिंगमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. Bajaj Chetak Urbane मध्ये दोन्ही बाजूला ड्रम ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. तर प्रीमियम व्हर्जन डिस्क ब्रेकसोबत येते. चला तर नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूयात.
बॅटरी आणि रेंज
चेतकच्या नवीन मॉडेलमध्ये 2.88 kWh बॅटरी पॅकची पॉवर देण्यात आली आहे. Chetak Premium मध्ये द्केहील इतक्याच कॅपॅसिटीचा बॅटरी पॅक आहे. मात्र नवीन चेतकची रेंज जास्त आहे. हि फुल चार्ज केल्यास 113 किलोमीटरचे अंतर कपू शकते. दुसरीकडे, सिंगल चार्जवर प्रीमियम व्हर्जनची रेंज 108 किलोमीटर इतकी आहे.
टॉप स्पीड
Bajaj Chetak Urbane च्या दोन्ही व्हेरिएंटला फुल चार्ज होण्यासाठी 4 तास 50 मिनिटे लागतील. चेतक अर्बनचा टॉप स्पीड 73 किलोमीटर प्रति तर प्रीमियम व्हर्जनचा 63 किलोमीटर आहे. नवीन स्कूटर टॉप स्पीडच्या बाबतीत पुढे आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये फक्त इको रायडिंग मोड आहे आणि त्याची एप कनेक्टिव्हिटी देखील लिमिटेड आहे.
Bajaj Chetak अर्बने प्राईस
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, चेतक अर्बन इफेक्टिव एक्स-शोरूम प्राईस 1,15,001 रुपये. तर Tecpac व्हेरिएंटसाठी 1,21,001 रुपये (इफेक्टिव एक्स-शोरूम प्राईस) खर्च करावे लागतील. बजाज चेतकच्या अगोदर आलेल्या प्रीमियम व्हर्जनची इफेक्टिव एक्स-शोरूम प्राईस 1,15,000 रुपये आहे.