हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते मनुके, जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे फायदे

मनुके खाण्याचे फायदे: उपाशी पोटी मनुके खाण्याचे फायदे अनेक आहेत. मनुक्यामध्ये (benefits of kismis) अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. शिवाय यामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन असतात जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे मदत करू शकतात. वास्तविक या ड्रायफ्रूटची खास गोष्ट हि आहे कि हे खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेसाठी अनेक प्रकारे मदत मिळते. मनुके आपली चयापचय प्रक्रिया वाढवते. शिवाय रिकाम्या पोटी मनुके भिजवून खाल्ल्याने उच्च रक्तदाब ते थायरॉईडमध्ये मदत मिळते. चला तर जाणून घेऊया रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे फायदे. (Raisins Benefits)

मनुके खाण्याचे फायदे. (Raisins Benefits)

उच्च रक्तदाबामध्ये फायदेशीर: हाय बीपीमध्ये रिकाम्या पोटी मनुका खाणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण चांगले असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. याशिवाय त्यात अनेक पॉलीफेनॉल असतात जे नायट्रिक ऍसिडसारखे काम करतात आणि रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करतात, ज्यामुळे बीपी कमी होण्यास मदत मिळते. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मनुके जरूर खावे.

ओरल हेल्थ साठी फायदेशी मनुके: मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे तोंडाच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची भूमिका बजावतात. शिवाय मनुकामधील सुक्रोज दातांची स्वच्छता आणि संरचना सुधारण्यास मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी मनुके चघळल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते.

हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते: हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. अशा स्थितीमध्ये सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाणे खूपच फायदेशीर ठरू शकते. यातील आयरन रेड ब्लड सेल्स वाढण्यास मदत करते आणि शरीरामध्ये रक्तवाढ होते. यामुळे आपल्याला हीमोग्लोबिन कमी होत नाही आणि आपण निरोगी राहतो.

उच्च फायबर समृद्ध: हाय फायबरने समृद्ध असलेले मनुके थायरॉईड ग्रंथीच्या कार्यास प्रोत्साहन देते. मनुक्यामध्ये फायबर, पॉलिफेनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ऍसिड असू शकतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असू शकतात. हे पोषक तत्व थायरॉईड संप्रेरक पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. हे शरीरात थायरॉईड-उत्तेजक संप्रेरक (TSH) चे उत्पादन आणि क्रिया वाढवण्यास मदत करते. यामुळे थायरॉईड हार्मोन बॅलेंस राहते.

एका दिवसात किती भिजलेले मनुके खावे (How many raisins to eat per day)

एका दिवसामध्ये तुम्हाला 8-10 मनुके खाल्ले पाहिजेत. जास्त प्रमाणात मनुके खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण हे पोषण तत्वांचे शोषण होण्यास रोखते. यामध्ये साखर आणि कॅलरी देखील जास्त असते आणि यामुळे दिवसाला जास्त मनुके खाल्ल्याने वजन देखील वाढू शकते. म्हणून दिवसाला 8-10 मनुके खावेत.

हेही वाचा: महिलांसाठी अमृत आहे जवस, पोटाच्या कानाकोपऱ्यात साचलेली घाण साफ करते, जाणून घ्या जवस खाण्याचे फायदे