Bhumi Pednekar at Kamakhya Temple: सध्या बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंदिरामध्ये स्पॉट केले जात आहेत. गेल्या आठवड्यामध्ये अनेक कलाकार राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पोहोचले होते. आता अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील कामाख्या देवीच्या मंदिरामधील काही फोटो शेयर केले आहेत. फोटोज मध्ये अभिनेत्री पूजा करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीसोबत तिची बहिण देखील फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये पोहोचली भूमी पेडणेकर – Bhumi Pednekar at Kamakhya Temple
कामाख्या देवीच्या मंदिराबद्दल खूप मोठी श्रद्धा आहे. नुकतेच अभिनेत्री भूमी पेडणेकर वर्षानुवर्षे जुन्या मंदिरात पोहोचली. फोटोमध्ये दोन्ही बहिणी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. कपाळावर तिला आणि गळ्यामध्ये हार घालून दोघी भक्तीत तल्लीन झालेल्या पाहायला मिळत आहेत.
अभिनेत्रीने मागितला नवस
कामाख्या देवीच्या मंदिरामधील अभिनेत्रीचा एक फोटो खूपच खास आहे. भूमि सिंह राजाच्या कानामध्ये नवस मागताना पाहायला मिळत आहे. यावरून अभिनेत्रीचा देवावर किती विश्वास आहे हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. (Bhumi Pednekar at Kamakhya Temple) भूमीचा पुजेमधील हा अंदाज चाहत्यांना खूप पसंद येत आहे.
हुबेहूब दिसत दोघी बहिणी
अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तिची बहिण समीक्षा पेडणेकर अगदी हुबेहूब एकमेकींसारख्या दिसतात. अनेकवेळा पापाराझी देखील त्यांना पाहून गोंधळून जातात. भूमीची बहिण समिक्षा एक मॉडेल आणि वकील आहे. समीक्षा देखील चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
हेही वाचा: कपाळी टिळा, गळ्यामध्ये फुलांची माळ… तमन्ना भाटियाने सहकुटुंब घेतले कामाख्या देवीचे दर्शन, पहा फोटोज