BMC Recruitment 2023-24 : मुंबई महानगरपालिकेमध्ये चौथी पास उमेदवारांसाठी भरती; असा करा ऑफलाइन अर्ज

BMC Recruitment 2023-24 : तुम्ही जर चौथी पास असा तर तुमच्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे. तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत हि भरती राबवण्यात येणार आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व सायग्नोस्टिक केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याकरिता 4 सफाई कामागांची कंत्राटी भरती करण्यात आली आहे.

सदर भरती सफाई कामगारच्या एकूण 4 रिक्त पदांसाठी भरती (BMC Recruitment 2023-24) करण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे. भरतीसाठी पदे, वेतन आणि अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

BMC Recruitment 2023-24 मधील पदे आणि पदसंख्या

  • सफाई कामगार : 04 जागा
  • एकूण रिक्त पदसंख्या : 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता: ऊमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • नोकरी ठिकाण : मुंबई
  • वयोमर्यादा : किमान 22 ते कमाल 45 वर्षे
  • अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार (पश्चिम), मुंबई 400052.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 26 डिसेंबर 202
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2024

अर्ज प्रक्रिया

या भरती प्रक्रीयेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहत. अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 02 जानेवारी 2024 पर्यंत सादर करने आवश्यक आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.
भरतीसाठी प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment