Dinesh Karthik New House Pictures: भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असून देखील यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक नेहमी चर्चेत असतो. तो आयपीएलमध्ये आरसीबी संघासाठी मॅच फिनिशरची भूमिका बजावतो. सध्या तो आपल्या संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे.
नुकतेच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये कार्तिक आपल्या नवीन घराची वास्तुशांती करतना दिसत आहे. यादरम्यान त्याची पत्नी दीपिका देखील दिस आहे. या कपलने पूर्ण विधिवत आपल्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला आहे. याआधी दिनेश कार्तिक मेगा स्टार रजनीकांतचा शेजारी होता.
शेयर केले घराचे फोटो (Dinesh Karthik New House Pictures)
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकप्रमाणेच त्याची पत्नी देखील खेळाशी संबंधित आहे. ती स्क्वॉश खेळाडू आहे. त्याने दीपिकाला 2015 मध्ये आपला जोडीदार बनवले होते. दीपिका त्याची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीने धोखा दिल्यानंतर दिनेश कार्तिक आता दुसऱ्या पत्नीसोबत आनंदी जीवन जगत आहे. तो नेहमी पत्नी दीपिकासोबत आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करत असतो.
यादरम्यान दिनेश करतीने नुकतेच एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये गृह प्रवेशाचे फोटो (Dinesh Karthik New House Pictures) पाहायला मिळत आहे. कार्तिकने सोशल मिडियावर फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये ‘हे नवीन सुरुवात आणि आठवणी ताज्या करण्यासाठी’ असे लिहिले आहे.
Dinesh Karthik चे क्रिकेट करियर
दिनेश कार्तिकच्या क्रिकेट करियरबद्दल बोलायचे झाले तर त्याने टेस्ट क्रिकेट मध्ये 26 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 7 अर्धशतके केली आहेत. वनडेमध्ये त्याने 94 सामने खेळले आहेत ज्यामध्ये 1752 धावा बनवल्या आहेत. यादार्म्यंत त्याने 9 अर्धशतके केली आहेत. तर T20I मध्ये कार्तिकने 60 सामने खेळताना 686 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने २४२ सामने खेळताना ४५१६ धावा केल्या आहेत.