स्वस्त झाली सिंगल चार्जमध्ये 150 किमी रेंज देणारी हि स्टायलिश इलेक्ट्रिक बाइक, खरेदी करण्यासाठी एकच गर्दी

Revolt RV400 BRZ: रिवोल्ट मोटर्स (Revolt Motors) भारतीय भारतीय इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये हळू हळू आपला विस्तार वाढवत आहे. इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंट भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर इतके मोठे तर नाही पण काही कापण्या सतत इलेक्ट्रिक बाइक्स लाँच करत आहेत. ज्यामध्ये रिवोल्ट मोटर्स आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पण अजूनदेखील यामध्ये वाढीची संभावना आहे. रिवोल्ट मोटर्सने विक्री वाढवण्यासाठी आणि मार्केटमध्ये हिस्सा वाढवण्यासाठी 2024 साठी 2023 मध्ये लाँच केलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीमध्ये नवीन RV400 BRZ इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. चाल तर याबदल विस्ताराने जाणून घेऊया.

Revolt RV400 BRZ 1.38 लाख मध्ये लाँच

रिवोल्ट ने RV400 BRZ ला 1.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये लाँच केले आहे. याचा अर्थ आहे कि आता ग्राहकांना या ईवीला कमी किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. रिवोल्टचे हे पाउल किंमत अपडेट करून अधिकाधिक खरेदीदारांना आकर्षित करून विक्री अधिक वाढवणे आहे. Revolt RV400 BRZ ची अपडेटेड किंमत 1,37,950 (एक्स-शोरूम) आहे, जी मर्यादित काळासही इंट्रोडक्टरी किंमत आहे.

5,000 रुपयांनी कमी झाली किंमत

Revolt RV400 BRZ ची गेल्या वर्षीची किंमत 1,42,950 (एक्स-शोरूम) रुपये होती. ज्याच्या तुलनेमध्ये याची नवीन किंमत 5,000 रुपये कमी आहे. रिवोल्ट RV400 BRZ लुनर ग्रीन, पॅसिफिक ब्लू, डार्क सिल्व्हर, रिबेल रेड आणि कॉस्मिक ब्लॅक या पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. मानक RV400 च्या तुलनेत RV400 मध्ये कोणतेही डिझाइन आणि मॅकेनिजम बदल केलेले नाहीत.

RV400, रिव्हॉल्टची एकमेव ऑफर

रिवोल्ट मोटर्स भारतामध्ये फक्त RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकल ऑफर करते. RV400 प्रमाणे, RV400 BRZ ही 3.24 kWh बॅटरीसह येते. हि इको मोडमध्ये 150 किमी, नॉर्मल मोडमध्ये 100 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 80 किमी रेंजचा दावा करते. कंपनीचा दावा आहे कि याची टॉप-स्पीड 80 किलोमीटर प्रति तास आहे. यामध्ये यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि रियर मोनो-शॉक सस्पेंशन, चारी बाजूला एलईडी लाइटिंग, 215mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. तर वजन 108 किलो आहे. हि 5 वर्षे किंवा 75,000 किमी च्या वॉरंटीसह येते.

हेही वाचा: तुमच्या स्कूटरमध्ये लावा ‘हे’ छोटे किट, मिळणार 130 किमी मायलेज, 1 किमीसाठी खर्च होतील फक्त 70 पैसे