अनेक वर्षांनंतर ‘दयाबेन’ आली समोर, अभिनेत्रीला ओळखणं कठीण, व्हिडीओ व्हायरल

Disha Vakani Viral Video: टीव्ही जगतामधून गायब असलेली दिशा वकांनी सध्या कुठे आहे आणि काय करते आहे? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आता सोशल मिडियावर तारक मेहता का उल्टा चश्मा मधील दयाबेन म्हणजे दिशा वकानीचा एक व्हिडीओ व्हायरल (Disha Vakani Viral Video) होत आहे. यामध्ये ती कुटुंबासोबत यज्ञ करताना दिसत आहे.

कुटुंबासोबत दिसली दिशा वकानी

नुकतेच मुंबईमध्ये मुंबई अश्वमेध गायत्री महायज्ञचे आयोजन करण्यात आले होते. याचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. अभिनेत्री दिशा देखील या पूजेमध्ये सामील झाली होती. दिशासोबत दोन्ही मुळे आणि तिचा पतीदेखील पाहायला मिळाला. व्हायरल व्हिडीओमध्ये (Disha Vakani Viral Video) दिशा पती आणि मुलांसोबत हवन करताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण कुटुंब पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. दिशाने पिवळ्या रंगाच्या साडीसोबत हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. तिने या लुकला मेकअप लुक ने कंप्लीट केले आहे.

तिने म्हंटले कि, तारक मेहता का उल्टा चश्मा च्या सेटवर देखील आम्ही गायत्री मंत्र पूजा खूप करत होतो. असे यज्ञ व्हावेत आणि सम्पूर्ण वातावरण सुधारते. चांगले विचार येतात आणि मुलांना देखील शिकायला मिळते.

वर्कफ्रंट

Disha Vakani Viral Video

दिशा वकानीला दया बेनच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. ती 2008 पासून तारक मेहता का उल्टा चश्माचा भाग होती. तथापि 2017 मध्ये ती मॅटरनिटी लीववर गेली आणि त्यानंतर ती शोमध्ये परतली नाही. फक्त एका एपिसोडमध्ये दिशा पाहायला मिळाली होती. पण यानंतर ती या शोमध्ये दिसली नाही. चाहते तिला शोमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत. नुकतेच निर्मात्यांनी असेही देखील सांगितले होते कि दया बेन लवकरच शोमध्ये परतणार आहे, पण असे अजून झालेले नाही. दिशाने जोधा अकबर आणि देवदास सारख्या चित्रपटांमध्ये सपोर्टिंग भूमिका केली होती.

News Title: disha vakani viral video