धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलचा 11 वर्षाचा संसार उध्वस्त!, परस्त्रीसाठी पतीने केली ईशा देओलची फसवणूक

Esha Deol Divorce: हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मुलगी ईशा देओल तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सध्या खूप चर्चेमध्ये आहे. असे म्हंटले जात आहे कि ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी (Esha Deol Divorce) एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ईशा आणि भरतला फिल्म इंडस्ट्री स्ट्रॉन्ग कपल म्हणून पाहिले जात होते. दोघे सोशल मिडियावर नेहमी फोटोज शेयर करत असत आणि इवेंट्स मध्ये देखील एकत्र पाहायला मिळत असत. पण गेल्या काही दिवसांपासूनचे चित्र वेगळे आहे. अशामध्ये चाहत्यांनी असा अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली आहे कि दोघे वेगळे झाले आहेत.

Esha Deol Divorce

वेगळे झाले ईशा-भरत (Esha Deol Divorce)

ईशा देओल आणि भरत तख्तानी (Esha Deol Divorce) यांच्यातील तुटलेल्या नात्याबद्दल बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये बरीच गॉसिप सुरू आहे. याची सुरुवात रेडीटच्या एका व्हायरल झालेल्या पोस्टमुळे झाली होती. पोस्टमध्ये म्हंटले होते कि पती-पत्नीमध्ये काहीच ठीक नाहीय, अशामध्ये दोघे वेगळे झाले आहेत. यानंतर युजर्सच्या लक्षात आले कि गेल्या वर्षी पासून सुरु झालेल्या फेस्टिव सीजनमध्ये ईशा देओल फक्त तिची आई हेमा मालिनी सोबत दिसली ओहटी. इतकेच नाही तर आमीर खानची मुलगी इरा खानचं रिसेप्शन पार्टीमध्ये देखील ती आईसोबत पोहोचली होती.

Esha Deol Husband Affair Rumors

आईशिवाय ईशा देओल आपल्या दोन मुलींसोबत देखील दिसली आहे. ईशाला छोट्या-मोठ्या इवेन्ट्समध्ये एकटीच स्पॉट केले गेले. इतकेच नाही तर वेगवेगळ्या दिवाळी पार्टीमध्ये देखील ती एकटीच पोहोचली होती. ती नेहमी पतीसोबत प्रत्येक इवेंट आणि पार्टीमध्ये पाहायला मिळत होती. इतकेच नाही तर सासू हेमा मालिनीच्या 75 व्या बर्थ डे सेलेब्रेशन मध्ये देखील भरत दिसला नव्हतं. यावरून कपलदरम्यान सर्व काही ठीक नसल्याच्या अफवांना आणखी बळ मिळाले.

काय आहे बातमीमागील सत्य

देओल आणि पती भरत तख्तानी यांनी काल घटस्फोटाची घोषणा केली. एका निवेदनाच्या माध्यमातून या कपलने विभक्त होण्याचे जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी निवेदनात म्हटले की, “आम्ही दोघांनीही एकमेकांच्या निर्णयाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनामध्ये होत असलेले बदल आणि मुलांच्या भविष्याचा विचार करता आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचा निर्णय अत्यंत महत्वाचा असून आम्ही कायमच मुलांच्या हिताचा विचार करू. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा.” असं त्यांनी निवेदनात जाहीर केलं.

ईशा देओल आणि भरत तख्तानीचे 2012 मध्ये झाले होते. या लग्नामध्ये देओल कुटुंबियांचा आनंद पाहायला मिळाला होता. आपल्या मुलीला जाताना पाहून धर्मेंद्रच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. दोघांना राध्या आणि मिराया नावाच्या दोन मुली आहेत.

हेही वाचा: 31 व्या वर्षी ‘या’ बिझनेसमॅनशी लग्न करणार अभिनेत्री, बॅचलर पार्टीमधला ‘तो’ व्हिडीओ व्हायरल