Genelia deshmukh: सुगड पूजन ते नैवैद्याचं ताट, देशमुखांच्या सुनबाईंनी ‘अशी’ साजरी केली मकर संक्रांत

Genelia Deshmukh: रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात आदर्श कपल मानले जाते, या दोघांची पहिली भेट 2003 मध्ये तुझे मेरी कसम चित्रपटादरम्यान झाली होती. 8-9 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे विवाह बंधनात अडकले होते. दोघांनी 3 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केले होते.

जेनेलियाने देशमुखांची सून झाल्यानंतर मराठी परंपरा आत्मसात केली. मुळची महाराष्ट्राची नसून देखील ती उत्तम मराठी बोलते. देशमुखांसोबत ती प्रत्येक मराठी सण उत्साहात साजरा करते. नुकतेच अभिनेत्री जेनेलियाने (Genelia Deshmukh) खास अंदाजामध्ये मकर संक्रांत साजरी केली. सध्या तिने शेयर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रितेश-जेनेलिया महाराष्ट्रामध्ये दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. दोघांच्या लग्नाला आता 10 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आधीपासूनच जेनेलिया देशमुख कुटुंबियांसोबत प्रत्येक मराठी सण अगदी उत्साहात साजरे करते. नुकतेच तिने आता मकर संक्रांती साजरी केली आहे.

Genelia deshmukh

मराठी परंपरेनुसार अभिनेत्री जेनेलियाने (Genelia Deshmukh) संक्रांतीचे पूजन उत्साहामध्येमध्ये केले. याची खास झलक अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमधून चाहत्यांना दाखवली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेयर केला आहे ज्यामध्ये कॅप्शनमध्ये चाहत्यांना खास अंदाजामध्ये मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश-जेनेलिया हि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. दोघांनी देखील चाहत्यांच्या मनामध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. रितेशने नुकतेच त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे, जिनिलीया शेवटची ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटात झळकली होती.

हेही वाचा: तारीख ठरली! प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर ‘या’ दिवशी करणार साखरपुडा