तारीख ठरली! प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर ‘या’ दिवशी करणार साखरपुडा

Prathamesh Parab Engagement Date: टाईमपास फेम अभिन्ता प्रथमेश परब सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेमध्ये आहे. गेल्यावर्षी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करून अभिनेत्यानी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

नुकतेच कपलने आपल्या साखरपुड्याच्या तारखेची घोषणा (Prathamesh Parab Engagement Date) केली आहे. इंस्टाग्रामवरून एक रोमँटिक पोस्ट शेअर करत प्रथमेशने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सर्व माहिती दिली आहे. नुकतेच या कपलचे कळवण थाटामाटात पार पडले होते. ज्याचे फोटो दोघांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले होते. ज्यामध्ये त्यांनी आपल्या लग्नाच्या तारखेची हिंट दिली होती.

शेयर केली साखरपुड्याची तारीख (Prathamesh Parab Engagement Date)

अखेर अभिनेता प्रथमेश परबने पोस्ट शेयर करून आपल्या चाहत्यांना साखरपुड्याची तारीख सांगितल आहे. अभिनेता आणि त्याची गर्लफ्रेंड येत्या 14 फेब्रुवारी रोजी साखरपुडा करणार आहेत. दोघांनी पहिली भेट व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच झाली होती. त्यांच्या रिलेशनशिपला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दोघांनी 14 फेब्रुवारी रोजी साखरपुडा (Prathamesh Parab Engagement Date) करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याने अद्याप लग्नाची तारीख घोषित केलेली नाही.

दरम्यान प्रथमेश परबने लांबलाच पोस्ट शेयर करून सर्व घटनाक्रम सांगितला आहे ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि, 14.2.2024 व्हॅलेंटाईन डे चं आमच्या रिलेशनशिपमध्ये स्पेशल स्थान आहे. म्हणजे इंडीविज्वली आम्ही व्हॅलेंटाईन डे वगैरे या कन्सेप्ट वर कधी फार बिलिव नाही करायचो, नेहमी च्या दिवसा सारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020- माझी व्हॅलेंटाईन डे स्पेशल फोटोशूट सिरीज बघून प्रथमेश ने मला पहिल्यांदा मेसेज केला.

प्रथमेश परबने पुढे लिहिले आहे, 14 फेब्रुवारी 2021- आम्ही आमची रिलेशनशिप स्टार्टकेली. 14 फेब्रुवारी 2022- अनेक आठवणीमध्ये आम्ही आमच्या रिलेशनशिपचे एक वर्ष पूर्ण केले. 14 फेब्रुवारी 2023- आमच्या रिलेशनशिप बद्दल सोशल मिडिया वर ऑफिशियली अनांसमेंट केलं. 14 फेब्रुवारी 2024 ला आमच्या रिलेशनशिप ला 3 वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी स्पेशल केलंच पाहिजे ना!! म्हणून 14 फेब्रुवारी 2024 ला आम्ही एंगेजमेंट करायचं ठरवलंय. Here’s #Pratija all set to the next chapter of our love story. PS- लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे बरं का!#keepguessing

हेही वाचा: ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री सुरभि चंदना अडकणार विवाह बंधनात, बॉयफ्रेंडसोबत घेणार सात फेरे