Gold Rate Today: जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याजवळ सुवर्णसंधी आहे. खरमासचा महिना सुरुवात होताच सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण सुरु झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईट नुसार सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान 24 कॅरेट सोन्याचा दर स्थिर राहिला. 10 ग्रॅम सोन्याचा दर (Gold Rate Today) 62,510 रुपये झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर कायम आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,300 रुपये झाला आहे.
अमेरिकी बाजारामध्ये चढ-उतार – Gold Rate Today
सोमवारी अमेरिकी बाजारामध्ये सोन्याला गती (Gold Rate Today) मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. महागाईचा डेटा जो आठवड्याच्या शेवटी अपेक्षित असतो फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर मार्गावर अधिक स्पष्टता प्रदान करेल. स्पॉट गोल्ड थोड्या बदलासोबत 2,019.49 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. US फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी घसरून 2,033.20 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी घसरून 23.76 डॉलर प्रति औंस झाले, तर प्लॅटिनम 0.1 टक्क्यांनी वाढून 940.91 डॉलर आणि पॅलेडियम 1.6 टक्क्यांनी घसरून 1,155.39 डॉलर वर आले. दिल्ली आणि मुंबईत सध्या एक किलो चांदीचा भाव 77,700 रुपयांवर आहे. चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा भाव 79,700 रुपयांवर आहे.
कमजोर मागणीमुळे सोने-चांदी घसरली
कमजोर मागणीमुळे सट्टेबाजांनी सौद्यांचा आकार सीमित केला, ज्यामुळे शुक्रवारी वायदा व्यवहारमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा दर 24 रुपयांनी घसरून 62,430 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. MCX वर फेब्रुवारी 2024 मध्ये डिलिव्हरीच्या कराराची किंमत 24 रुपये किंवा 0.04 टक्क्यांनी घसरून 62,430 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यामध्ये 15,063 लॉटचे व्यवहार झाले.
बाजार विश्लेषकांनी सांगितले की, कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती घसरल्या. जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये सोने 0.34 टक्क्यांनी घसरून 2,051.80 डॉलर प्रति औंस झाले. चांदीचा भाव 18 रुपयांनी घसरून 75,058 रुपये प्रति किलो झाला. MCX वर, मार्च 2024 डिलीवरी मध्ये वितरणासाठी चांदीच्या कराराची किंमत 18 रुपये म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 75,058 रुपये प्रति किलो झाली. यामध्ये 14,032 लॉटचे व्यवहार झाले. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये चांदीची किंमत 0.32 टक्क्यांनी वाढून 24.45 डॉलर प्रति औंस झाली.
तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
- मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा रेट 62,510 रुपये आहे.
- कोलकातामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा रेट 62,510 रुपये आहे.
- हैदराबादमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा रेट 62,510 रुपये आहे.
- दिल्ली 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा रेट 62,660 रुपये आहे.
- बेंगळूरमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा रेट 62,510 रुपये आहे.
- चेन्नईमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा रेट 63,160 रुपये आहे.