Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या तुमच्या शहरामधील सोन्याचा भाव

Gold Rate Today: सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे आणि अशामध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today) वाढ पाहायला मिळत आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, 23 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रती 10 ग्रॅम 250 रुपयांची वाढ झाली, तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रती 10 ग्रॅम 230 रुपयांची वाढ झाली. मुंबईमध्ये सोन्याचा बहव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,800 रुपये प्रती ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 6,323 रुपये प्रति ग्रॅम आहे.

लग्नसराईत सोन्याचा भाव वधारला

24 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये 0.61 टक्के बदल झाला आहे, गेल्या महिन्यामध्ये सोन्याच्या दरात 0.96 टक्क्यांनी घट झाली होती. आता ऐन लग्नसराईमध्ये सोन्याचा भाव वाढताना दिसत आहे. सोन्याचा भाव (Gold Rate Today) वाढत असला तरी सोन्याची मागणी कमी झालेली पाहायला मिळत आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरामध्ये देखील वाढ पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव आज 300 रुपयांनी वाढला आहे. आज चांदीचा (silver) भाव 79500 रुपये प्रती किलो आहे.

Gold Rate Today

तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव (Gold Rate Today )

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
  • चेन्नईमध्ये सोन्याचा भाव स्थिर असून आजच्या सोन्याचा भाव 63550 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे तर एक किलो चांदी 300 रुपयांनी वाढून भाव 81000 रुपयांवर पोहोचला आहे.
  • दिल्लीमध्ये सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली असून 230 रुपयांच्या वाढीसोबत आजचा सोन्याचा बहव 63380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर चांदीचा भाव 79500 रुपये प्रति किलो आहे.
  • मुंबईमध्ये सोन्याच्या दरामध्ये 230 रुपयांची वाढ झाली असून आजचा सोन्याचा भाव 63230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर एक किलो चांदीचा भाव 79500 रुपये आहे.
  • कोलकातामध्ये सोन्याचा भाव 230 रुपयांनी वाढला असून आजचा सोन्याचा भाव 63230 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी प्रती किलो 300 रुपयांनी वाढून 79500 रुपयांवर पोहोचली आहे.
Gold-Silver Price Today

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोन्याचा दर

  • पुणे मध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 63230 रुपये आहे. (Pune Gold Rate)
  • नाशिक मध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 63260 रुपये आहे. (Nashik Gold Rate)
  • नागपूर मध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 63230 रुपये आहे. (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 63230 रुपये आहे. (Kolhapur Gold Rate)

Leave a Comment