Gold Rate Today : लग्नसराईच्या काळामध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today) वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 63, 120 असून मागच्या ट्रेडमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,110 वर बंद झाली होती. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार चांदीचा (Silver) आजचा दर 75,450 रुपये प्रती किलोग्रॅम इतका आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 75,440 प्रती किलोग्रॅम इतका होता.
ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव गगनाला
24 कॅरेट सोन्याच्या किमतीत गेल्या एका आठवड्यात 0.61 टक्के बदल झाला आहे, गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात 0.96 टक्क्यांनी घट झाली होती. आता ऐन लग्नसराईत मात्र, सोन्याला झळाळी मिळताना दिसत आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate Today) वाढ होत असतानाही सोन्याची मागणी कमी झालेली दिसत नाही.
वेगवेगळ्या शहरामध्ये सोन्याचा भाव (Gold Rate Today )
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
- मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,750 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,000 रुपये इतका आहे. (Mumbai Gold Rate)
- पुण्या मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,750 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,000 रुपये इतका आहे. (Pune Gold Rate)
- नाशिक मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,750 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,000 रुपये इतका आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर मध्ये 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 57,750 रुपये आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,000 रुपये इतका आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 63230 रुपये आहे. (Kolhapur Gold Rate)