Gold Rate Today Pune: गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचा वाढता भाव आज थांबला आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या भावात दिलासा मिळत दर खाली आले. नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच दिवस उरले असून त्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. परदेशी आणि देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत असून अमेरिकेतील रोखे उत्पन्न वाढीमुळे सराफा बाजारावर दबाव आल्याचे दिसून येत आहे.
सोने-चांदी स्वस्त (Gold Rate Today Pune)
शुक्रवारी देशभरातील सोन्य-चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today Pune) मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमतीमध्ये लक्षणीय घट झाली तर चांदीच्या दारामध्ये थोडा बदल पाहायला मिळाला. अशा स्थितीमध्ये शुक्रवारी (29 डिसेंबर) सोने 200 रुपयांनी स्वस्त होऊन आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,135 रुपये प्रती 10 ग्रॅम वर पोहोचला आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला आहे.
त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये 760 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा आजचा दर 74,290 रुपये प्रती किलो इतका आहे. पुणे सराफा बाजारामध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर (22k gold rate today pune) 58,083 रुपये आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर (gold rate today pune 24 carat) 63,320 रुपये इतका आहे आणि चांदीचा आजचा दर 74,200 रुपये प्रती किलो आहे.
सोन्या-चांदीचे वायदे
प्रॉफिट बुकींगमुळे शुक्रवारी देशांतर्गत सोन्या-चांदीचे वायदे दबावामध्ये ट्रेड करताना पाहायला मिळाले. देशांतर्गत वायदे बाजारामध्ये सोन्य-चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today) मोठी घसरण पाहायला मिळत असून MCX वर सोन्याचा भाव 114 रुपयांनी घसरला आहे आणि 10 ग्रॅम 63,275 इतका झाला आहे. त्याचाबरोबर चांदी देखील 684 रुपयांनी घसरून 74,275 रुपये प्रती किलो झाली आहे.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव तीन आठवड्याच्या उच्चांकावरून घर्सला आहे. यूएस बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कॉमेक्सवर सोने 2080 डॉलरच्या खाली घसरले, तर चांदीची किंमतही 24 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. आर्थिक दृष्टिकोनामुळे रोख्यांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आणि 10 वर्षांचे रोखे उत्पन्न ३.८४ टक्क्यांवर पोहोचले.