IPL 2024: हार्दिक पंड्या IPL 2024 मध्ये रोहित शर्माच्या ठिकाणी मुंबई इंडियन्सची कमान सांभाळणार आहे. मात्र हि गोष्ट मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पटलेली नाही. सोशल मिडियावर चाहत्यांनी नाराजी दर्शवली. मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड संतापलेले दिसत आहेत.
सोशल मिडियावर जेव्हा हार्दिक मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार असल्याची घोषणा झाली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या ट्विटर (आता X), फेसबुक आणि इंस्टाग्राम वर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला. काही चाहते तर हे देखील सांगू लागले कि आता ते मुंबई इंडियन्सला अनफॉलो करत आहेत. चाहत्यांनी अनफॉलो करण्यास सुरुवात केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या फॉलोअर्समध्ये तब्बल 4 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्सची घट झाली आणि यामध्ये आणखी घट होत चालली आहे.
चाहत्यांनी दिला झटका – IPL 2024
सोशल मिडियावर काही चाहत्यांनी हे देखील म्हंटले आहे कि हार्दिक पैशांसाठी गुजरात टीम सोडली आणि आता तो मुंबई टीममध्ये आला आहे, हा निर्णय IPL हिस्ट्रीमधील सर्वात खराब डिसिजन आहे एका व्यक्तीने X (पूर्व में ट्विहटर) वर लिहिले आहे कि, मुंबई इंडियन्स यावेळी पॉईंट टेबलमध्ये सर्वात खाली राहील. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले कि रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्यास पात्र होता. तर आणखी एका X हे देखील लिहिले आहे कि आम्हाला हे स्वीकार नाही, रोहितने रिटायर होईपर्यंत कर्णधार राहिले पाहिजे. शिवाय इतर लोकांनी म्हंटले कि सूर्यकुमार यादव देखील टीमचे कर्णधार पद सांभाळू शकत होता. वास्तविक सूर्या सध्या टीम इंडियाच्या T20 चे कर्णधार पद सांभाळत आहे. अनेक चाहत्यांनी तर यावर अनेक मिम्स करून शेयर केले आहेत.
रोहितला कर्णधारपदावरून हटवणे सर्वात खराब दिवस – IPL 2024
सोशल मिडियावर असे अनेक लोक आहेत जे रोहितला कर्णधारपदावरून हटवणे सर्वात खराब दिवस म्हणत आहेत. तर काही लोकांनी हा निर्णय खूपच लाजीरवाणा असल्याचे म्हंटले आहे. एका चाहत्याने तर हे देखील म्हंटले कि मुंबई इंडियन्सला त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. रोहित बद्दल लोकांनी हे लिहिले कि तो IPL हिस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ट कर्णधार आहे.
मुंबई इंडियन्सने केली रोहितसाठी पोस्ट
मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी रोहितला राजा असल्याचे म्हंटले आहे. व्हिडीओच्या मॅसेजमध्ये लिहिले आहे कि, 24 एप्रिल 2013 रोजी MI चे कर्णधारपद स्वीकारले. संघ अडचणीत असताना विश्वास जपला. हार-जीतमध्ये हसत राहा असे म्हणालास. 10 वर्षे आणि 6 ट्रॉफींनंतर आम्ही इथे आहोत. तू नेहमी आमचा कॅप्टन राहशील. या पोस्टमध्ये सुर्य्कुमार यादवने देखील एक इमोजी शेयर केला आहे. या पोस्टवर देखील सोशल मिडिया चाहते नाराज आहेत.
Also Read: कोण आहे Vrinda Dinesh? 10 लाख बेस प्राईस असलेल्या खेळाडूला मिळाले तब्बल 1.30 करोड