Ira Khan Wedding: आमिर खानची मुलगी इरा खान बनणार नुपूर शिखरेची नववधू, फोटो व्हायरल

Ira Khan Wedding: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या त्यांची मुलगी इरा खानच्या एंगेजमेंटमुळे खूप चर्चेमध्ये आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या बॉलीवूड चित्रपटांपासून दूर आहे. चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आमिरच्या खानच्या घरी सध्या सनई-चौघडे वाजणार आहेत. त्याची मिटली इरा खान लवकरच विवाहबंधनात (Ira Khan Wedding) अडकणार आहे. ज्याची तयारी जोरात सुरु आहे.

इरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. इरा खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत इटलीमध्ये एंगेजमेंट केली होती आणि मुंबईमध्ये एंगेजमेंट पार्टी देखील झाली होती. या दरम्यान त्यांच्या लग्नाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता कपलच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. अशामध्ये कपलसंबंधी अपडेट समोर आली आहे.

विवाह बांधणार अडकणार इरा खान (Ira Khan Wedding)

इरा खानचे लग्न जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे. हे लग्न उदयपुरमध्ये आऊटडोअर लोकेशनवर होणार आहे. बातमीनुसार असे म्हंटले जाते आहे कि विधी आणि रीतीरिवाजाच्या अगोदर 3 जानेवारी रोजी दोघे रजिस्टर्ड मॅरेज करणार आहेत. यासोबत लग्नानंतर 13 जानेवारी रोजी मुंबईमध्ये वेडिंग रिसेप्शनचे नियोजन केले जाणार आहे. सध्या आमिर खान आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.

मोठ-मोठे स्टार्स राहणार उपस्थित

माहितीनुसार इरा खान आणि नुपूर शिखरे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार आहेत. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि या लग्नाची गेस्ट लिस्ट देखील समोर आली आहे, मिडिया रिपोर्ट्सनुसार आमिर खानच्या मुलीच्या लग्नामध्ये सलमान खान, जूही चावला, फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा, रितिक रोशन, शाहरुख खान आणि करीना कपूर सहित अनेक बॉलीवूड दिग्गज सामील होणार आहेत. तथापि यांच्या नावावर अजून कोणतेही ऑफिशियल कंफर्मेशन आलेले नाही. अशामध्ये हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे कि मिस्टर परफेक्शनिस्टच्या मुलीच्या लग्नामध्ये बॉलीवूडचे कोणते स्टार्स सामील होतात.

हेही वाचा: सीन शूट करताना ब्लाऊजचे हुक तुटले अन्…, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेयर केला सेटवरचा धक्कादायक अनुभव