OnePlus Ace 3: वनप्लस आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 3 लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 4 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार आहे. रिपोर्टनुसार ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन OnePlus 12R नावाने 23 जानेवारी रोजी एंट्री करेल. लाँच च्या अगोदर कंपनी या फोनचे फीचर्स टीज करत आहे.
दरम्यान आता वनप्लस ने Ace 3 च्या सिग्नल स्टेबिलिटी ची माहिती दिली आहे. टीजर नुसार हा फोन 360 डिग्री अँटेनासह येईल, जो पूर्वीपेक्षा अधिक सिग्नल स्टेबिलिटी देईल. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच, हे सर्वोत्कृष्ट सिग्नल स्ट्रेंथ प्रदान करेल, जे गेमर्सचा गेमिंग अनुभव उत्कृष्ट बनवेल.
पूर्वीपेक्षा जास्त स्पीड आणि कमी लेटेंसी साठी कंपनी यामध्ये Wi-Fi 7 सपोर्ट देखील देणार आहे. OnePlus Ace 3 फोन गेम क्लाउड कॉम्प्युटिंग प्रायव्हेट नेटवर्कसह येईल. यामध्ये यूजर्सना गेमिंगचा आनंद घेण्यासाठी 2 वर्षांची फ्री ट्रायल देखील मिळेल. याशिवाय फोनमध्ये मल्टी-डायरेक्शनल NFC देखील देण्यात आला आहे. कंपनीने टीझरमध्ये आधीच खुलासा केला आहे की फोन ProXDR पॅनल आणि फोटो मॅट्रिक्स डिस्प्ले तंत्रज्ञानासह येईल. फोनमध्ये विशेष रेन टच फीचर देखील असेल, जेणेकरुन युजर्स हा फोन ओल्या हाताने देखील वापरू शकतात.
OnePlus Ace 3 चे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनी OnePlus Ace 3 फोनमध्ये 2780×1264 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78 इंच BOE X1 8T LTPO डिस्प्ले देऊ शकते. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेटसह आणि 4500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस लेव्हलसह येईल. फोन 16 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन मध्ये येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देणार आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे असतील. यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगलसह 50-मेगापिक्सलचा मुख्य लेंस आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर सामील असेल. तर सेल्फीसाठी कंपनी मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे. फोनची बॅटरी 5500mAh असेल. ही बॅटरी 100 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सँड गोल्ड, स्टार ब्लॅक आणि मून सी ब्लू या तीन कलर पर्यायांमध्ये फोन उपलब्ध होईल.
हेही वाचा: Oppo Find X7 Oppo Find X7 Ultra चे स्पेसिफिकेशंस आले समोर, जाणून घ्या कधी लाँच होणार स्मार्टफोन