JAC Yiwei EV: जानेवारीमध्ये लाँच होणार पहिली लिथियम फ्री बॅटरी वाली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

JAC Yiwei EV: पर्यावरण प्रदूषणपासून मुक्ती मिळवण्यासाठी ऑटोसेक्टर मध्ये जैवइंधनाच्या पर्यायांचा शोध घेण्याच्या स्वरूपात अनेक मोठे बदल आतापर्यंत समोर आले आहेत. दरम्यान आता इलेक्ट्रिक आणि इथेन इंधनावर चालणाऱ्या वाहनांसोबतच सोडियम-आयन बॅटरीने सुसज्ज असलेली पहिली इलेक्ट्रिक कारही एक नवीन पर्याय म्हणून समोर आली आहे. ज्या अंतर्गत फॉक्सवॅगनच्या मालकीची चीनी ऑटोमेकर JAC Motors सोडियम-आयन बॅटरीने सुसज्ज असलेली पहिली इलेक्ट्रिक कार (JAC Yiwei EV) त्यांच्या नवीन Yiwei ब्रँड अंतर्गत लाँच करेल. जाणून घेऊया या कार संबंधी माहिती.

थंड हवामानात चांगली कामगिरी

JAC Yiwei EV हॅचबॅक कार संबंधी डिटेल्स बद्दल बोलायचे झाले तर या कंपनीने दावा केला आहे कि आगामी कार सोडियम-आयन बॅटरी आणि लिथियम बॅटरीने सुसज्ज असल्याने, मेंटेनन्स आणि फ्युलवर येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत या कारवर खूपच कमी खर्च होतो. या बॅटरीच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नसली तरी, सर्वात मोठे फिचर म्हणते JAC Yiwei EV ची बॅटरी थंड हवामानात देखील गोठत नाही. या खास बॅटरीने सुसज्ज असलेल्या कार लवकरच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात यशस्वी ठरतील.

JAC Yiwei EV

JAC Yiwei EV लुक आणि फीचर्स

JAC Yiwei EV च्या फीचर्सबदल बोलायचे झाले तर याची रेंज लिथियम-आयरन-फॉस्फेट बॅटरीसोबत लाँच झालेल्या Yiwei 3 505 किलोमीटरच्या तुलनेमध्ये जवळ जवळ 250 किमी असू शकते. या कारमध्ये नवीन HiNa सोडियम बॅटरी मिळू शकते. या कारच्या बॅटरी पॉवरबद्दल बोलायचे झाले तर 25kWh क्षमतेची बॅटरी सुमारे 20 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज होऊ शकते. हि कार एकदा चार्ज केल्यानंतर 252 किलोमीटरचे अंतर कपू शकते.

Yiwei ब्रँडचे अध्यक्ष जिया शुनली यांचे चीनी कार JAC Yiwei EV च्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल म्हणणे आहे कि इंधन पर्याय म्हणून सोडियम बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वस्त आहेत, यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळेल. नवीन Yiwei EV मध्ये HiNA बॅटरीमधील बॅटरी पॅक बेलनाकार सोडियम-आयन सेलचा वापर करण्यात आला आहे. हेच या बॅटरीचेचे सर्वात मोठे फिचर आहे.

कंपनीच्या मॉड्युलर युनिटाइज्ड एन्कॅप्सुलेशन (UE) हनीकॉम्ब स्ट्रक्चरसह बॅटरी तयार केली जातात. हे पॉवर पॅक बॅटरीला अधिक टिकाऊ आणि चांगला परफार्मेंस देण्यास फायदेशीर सिद्ध होते.

हेही वाचा: Mahindra XUV300 Facelift जबरदस्त फीचर्ससोबत करणार धमाकेदार एंट्री, मिळणार नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स