गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर

Gold Rate Today Pune: नवीन वर्षाच्या अगोदर सोन्या-चांदीच्या दरांबाबत चांगली बातमी पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये (Gold Rate Today Pune)घसरण पाहायला मिळत आहे. 28 डिसेंबर रोजी सोने 64,250 रुपये प्रती प्रति 10 ग्रॅम होते. तर शुक्रवारी सोन्याने आपला उच्चांक गाठला होता.

सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार कायम आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर सोन्याचे आजचे दर एकदा जाणून घ्या.

वर्षाच्या सरतेशेवटी सोन्या-चांदीच्या दरात घसरण

गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचे दर घसरले हे. शुक्रवारी सोनं 350 रुपयांनी स्वस्त झालं होतं. तर आज म्हणजेच शनिवारी 30 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये आणखी घट झाली. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्याचा दर 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,550 रुपये आहे.

सोन्याच्या दरात घसरण (Gold Rate Today Pune)

आज सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22k gold rate today pune) 58550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर (gold rate today pune 24 carat) 63870 प्रति 10 ग्रॅम आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Price Today) 47,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Rate Today Pune

चांदीचा दर 300 रुपयांनी वाढला

आज शनिवारी 300 रुपयांनी वाढला असून चांदीचा दर 78,600 रुपये आहे. शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीमध्ये चांदीचा दर 1200 रुपयांनी घसरल्यामुळे 78,300 रुपयांवर आला होता. चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा दर 80,000 रुपये आहे.

तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव (Gold Rate Today )

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
  • चैन्नईमध्ये सोनं 450 रुपयांनी वाढले असून आजच्या 24 कॅरेट सोन्याचा दर 64470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि एक किलो चांदीचा आजचा दर 300 रुपयांनी वाढला असून 81000 रुपयांवर पोहोचला आहे.
  • दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63970 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा दर 78600 रुपये प्रति किलो इतका आहे.
  • मुंबईमध्ये सोनं 430 रुपयांनी वाढलं असून 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीचा दर 79500 रुपये इतका आहे.
  • कोलकातामध्ये सोनं 430 रुपयांनी वाढलं असून 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीचा दर 300 रुपयांनी वाढून 78600 रुपयांवर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today Pune)
  • नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today Nashik)
  • नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today Nagpur)
  • कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today Kolhapur)