Kinetic E-Luna: कायनेटिक ग्रीनने गेल्या वर्षी आपल्या लोकप्रिय मोपेड लुनाचे इलेक्ट्रिक (Kinetic E-Luna) मॉडेल आणायची घोषणा केली होती. आता कंपनी 26 जानेवारीपासून याची बुकिंग सुरु करणार आहे. ज्यांना ई-लुना खरेदी करायची आहे ते फक्त 500 रुपये टोकन रक्कम भरून बुकिंग करू शकतात. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याचे सर्व डीटेल्स शेयर केले आहेत. इथे तुम्ही सर्व माहिती टाकून बुक करू शकता. तथापि कंपनीने अजूनपर्यंत याच्या डिझाईन, फीचर्स आणि इतर स्पेसिफिकेशंस बद्दल कोणतीही माहिती शेयर केलेली नाही. पण याच्या पेटंटचे काही फोटो समोर आले आहेत.
लीक झालेल्या फोटोमध्ये ई-लुना जुन्या अवतारामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र जुन्या मॉडेलच्या तुलनेमध्ये यामध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. हि पूर्वीप्रमाणे सध्या मॉडेलमध्ये येईल. याच्या फ्रंटमध्ये एलईडी लाइट पाहायला मिळू शकते. मोठा बदल हा आहे कि यामध्ये पेडल्स पाहायला मिळणार नाहीत. नवीन ई-लुनाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी कंपनीला आशा आहे. जुन्या लुनाची सुरुवात 50cc इंजिन पासून झाली होती.
Kinetic E-Luna प्रोडक्शन आणि रेंज
इलेक्ट्रिक लुना किंवा ई-लुना (Kinetic E-Luna) हि कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्सचे उत्पादन असेल. जो कायनेटिक ग्रुपचा सहयोगी ब्रँड आहे. कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स अहमदनगर, महाराष्ट्र येथे ई-लुनाचे उत्पादन करेल. कंपनीने चेसिस आणि इतर सब असेंबलीचे प्रोडक्शन देखील सुरु केले आहे. सुरुवातीलाला प्रत्येक महिन्याला याच्या 5,000 युनिट्सचे प्रोडक्शन केले जाण्याची संभावना आहे.
स्पेसिफिकेशंस
Specification | Details |
---|---|
Sales Package | Charger, Tool Kit, Owner’s Manual |
Charger | Portable Charger |
Brand | Kinetic Green |
Model Name | E-Luna |
Model Year | 2024 |
Brand Color | Mulberry Red |
Type | Electric Scooter |
Color | Red |
Motor Type | Brushless DC Hub Motor |
Body Material | Aluminium |
Wheel Material | Steel |
Number of Wheels | 2 |
Seating Capacity | 2 |
Transmission Type | Automatic |
Maximum Torque | 22 nm |
Maximum Speed | 50 km/hr |
Range | 110 km |
Console Features | Speed, Odometer, Trip, Battery SOC, DTE, Direction Indicator, High Beam Indicator, Ready Symbol |
Tail Lamp | Filament Type |
Turn Light | Filament Type |
Number of Batteries | 1 |
Power Source | Battery |
Battery Size | 2.0 |
Battery Type | Lithium-ion |
Battery Capacity | 2 kWh |
Motor Power | 2 Watt |
Charging Time | 4 Hr |
Tire Type | Tubed |
Wheel Type | Spoke Wheel |
Tire Size (Front) | 2.50 -16″ Tube Tyre |
Tire Size (Rear) | 2.50 -16″ Tube Tyre |
Brake (Front) | Drum |
Brake (Rear) | Drum |
Other Brake Features | Hand Operated, Combi |
Suspension (Front) | Telescopic Fork |
Suspension (Rear) | Dualshock |
Length | 1.985 m |
Width | 0.735 m |
Height | 1.036 m |
Wheelbase | 1335 mm |
Seat Height | 760 mm |
Kerb Weight | 96 kg |
Total Weight | 96 kg |
Ground Clearance | 170 mm |
Warranty Summary | NA |
Service Type | NA |
Covered in Warranty | Yes |
Not Covered in Warranty | Wear and Tear parts are not covered by this warranty, as they are subject to natural degradation over time. Glass items are not included in the warranty coverage, given their susceptibility to breakage. Plastic and rubber components are also not part of the warranty, as they wear down due to regular use. |
मागणी वाढल्यास उत्पादनामध्ये वाढ करण्यात येईल. कंपनी कायनेटिक इलेक्ट्रिक लुनासाठी (Kinetic E-Luna) स्वतंत्र असेंब्ली लाइन तयार करत आहे. त्यासाठी असेंब्ली लाईनवर 30 नवीन वेल्डिंग मशीन बसवल्या गेल्या आहेत. यासाठी स्पेशल पेंट बूथ आणि फॅब्रिकेशन सेटअप देखील लावला गेला आहे. लुनाच्या इलेक्ट्रिक मॉडलला लवकरच शोकेस केले जाईल.
आता हि गोष्ट सांगणे खूप घाईचे ठरेल कि यामध्ये फिक्स्ड बॅटरी असेल की स्वॅप करण्यायोग्य बॅटरी असेल. (Kinetic E-Luna) ला फ्लिपकार्ट देखील लिस्टेड केले गेले आहे. इथे दिलेल्या सर्व डीटेल्सनुसार सिंगल चार्जवर याची रेंज 110 किमी असेल. तर टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास असणार आहे. ई-लुनाची किंमत 71,990 निश्चित करण्यात आली आहे. तर ग्राहक हि 2,500 रुपयांच्या मासिक ईएमआयसह देखील खरेदी करू शकतील. कंपनीचे सुरुवातीला 50 हजार ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असणार आहे.
हेही वाचा: आता फॅमिली कार नाही, येत आहे फॅमिली स्कूटर, कमी किंमतीत मिळणार दमदार फीचर्स