Salman Khan Meets Jaganbir: सलमान खानने पूर्ण केले 9 वर्षाच्या चिमुकल्या चाहत्याचे स्वप्न, पहिल्या भेटीमध्ये भाईजानने दिले होते ‘हे’ वचन

Salman Khan Meets Jaganbir: सलमान खान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भाईजान नावाने ओळखले जाते. आपल्या चित्रपटामध्ये लोकांची मदत करताना पाहायला मिळणारा सलमान खऱ्या आयुष्यामध्ये देखील एखाद्या हिरो पेक्षा कमी नाही. तो नेहमी इंडस्ट्रीमधील लोक, गरजू आणि चाहत्यांच्या मदतीसाठी पुढे येत असतो. आता सलमान खानने आपल्या 9 वर्षाच्या चाहत्याला दिलेले वचन पूर्ण केले आहे.

Salman Khan Meets Jaganbir

सलमान खानने पूर्ण केले चाहत्याचे स्वप्न (Salman Khan Meets Jaganbir)

9 वर्षाच्या जगनबीर नावाच्या मुलाला सलमान खान भेटला आहे. जगनबीर आणि त्याच्या कुटुंबीयांना आपल्या घरी बोलावून अभिनेत्याने त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये 30 मिनिटे संभाषण झाले. वस्तीविक जगनबीर एक कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. वयाच्या 4 थ्या वर्षी त्याला ट्युमरने ग्रासले होते. 2018 मध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जगनबीरच्या कुटुंबाने त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा सलमान खान पहिल्यांदा त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता.

Salman Khan Meets Jaganbir

वयाच्या 4 थ्या वर्षापासून आजारी आहे जगनबीर

4 वर्षाच्या जगनबीरची दृष्टी ट्यूमरमुळे गेली. तो सलमान खानचा मोठा चाहता आहे. त्याने हॉस्पिटलमध्ये एक व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने सलमान खानचा चाहता असल्याचे सांगत त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमान खान जेव्हा त्याला भेटला तेव्हा त्याची केमोथेरपी सुरू होती. छोट्या जगनबीरची प्रकृती खूप नाजूक होती. त्याची दृष्टी गेल्यामुळे सुरुवातीला त्याला विश्वास बसला नव्हता कि सलमान खान त्याला भेटण्यासाठी (Salman Khan Meets Jaganbir) आला आहे. तथापि अभिनेत्याला बोलल्यानंतर त्याला विश्वास बसला होता.

2018 मध्ये जगनबीरला भेटल्यानंतर सलमान खान ने (Salman Khan Meets Jaganbir) त्याला वचन दिले होते कि जर त्याने चॅम्पियनप्रमाणे कॅन्सरशी लढा दिला तर तो त्याला पुन्हा भेटेल. हेच 5 वर्षापूर्वीचे वचन सलमान खानने पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी जगनबीरने कॅन्सरची लढाई जिंकली होती. यानंतर सलमान खानच्या टीमने त्याच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधला आणि त्यांना सुपरस्टारच्या वांद्रे येथील घरी बोलावले. येथे सलमानने बरे झालेल्या जगनबीर आणि त्याच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा भेटून आपले वचन पूर्ण केले. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आता जगनबीरलाही पाहता येणार आहे. आशा आहे की तो लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईल.