Kinetic E-Luna on Road Prices in Top Indian Cities: कायनेटिक ग्रीनची (Kinetic Green) ची पॉपुलर मोपेड ई-लूना भारतीय मार्केटमध्ये दाखल झाली आहे. ई-लूना फ्लिपकार्ट आणि इंडियामार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करू शकता. कंपनीने याची बुकिंग 26 जानेवारी 2024 पासून सुरु केली आहे. 500 रुपये टोकन अमाउंट देखील बुक करू शकता. याची सुरुवातीची किंमत 70,000 रुपये आहे. ई-लूना (Kinetic E-Luna) X1 आणि X2 अशा दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झाली आहे. सिंगल चार्जमध्ये याची रेंज 110 किमी आहे. इलेक्ट्रिक मॉडेल असूनही, लुना आता अधिक पॉवरफुल आणि दमदार आहे. अशामध्ये तुम्ही जर ई-लूना खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर तुमच्या शहरामध्ये याची ऑन-रोड किंमत किती आहे जाणून घ्या.
फायनान्स आणि ईएमआय ऑप्शन
लूना इलेक्ट्रिक गेल्या वर्षीच्या पेट्रोल- मॉडल लूनावर बेस्ड आहे. हि खूपच हलकी ईवी आहे. हि डेली लाईफसाठी डिझाईन केली गेलेली शानदार ईवी आहे. कामगिरीमध्ये ई-लूना ओजी लूना सारखीच आहे. ग्राहक हि लूना 2,000 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकतात. याला 36 महिन्यासाठी फायनांस केले जाऊ शकते.
ई-लूना फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या हि लूना (Kinetic E-Luna) फक्त ओशन ब्लूच्या या सिंगल कलरमध्ये खरेदी केली जाऊ शकते. कंपनीने यामध्ये 2 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी पॅक दिली आहे. मोटरचा टाइप देखील 2 वॅट आहे. सिंगल चार्जमध्ये याची रेंज 110 किमी पर्यंत असेल. त्याचबरोबर याची टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास असेल. कंपनी यासोबत एक पोर्टेबल चार्जर देखील देते. या इलेक्ट्रिक मोपेडला फुल चार्ज होण्यास्तही 4 तासाचा वेळ लागेल. कंपनीने यामध्ये ट्यूब टायरचा वापर केला आहे.
या मोपेडमध्ये फिक्स्ड बॅटरी मिळणार का स्वॅपेबल, याबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याचा टॉर्क 22 Nm असेल. स्पीड, ओडोमीटर, ट्रिप मीटर, बॅटरी एसओसी, डीटीई, डायरेक्शन इंडिकेटर, हाय बीम इंडिकेटर, रेडी सिंबॉल सारखे फीचर्स देखील मिळतील. यामध्ये टेल आणि टर्न साठी फिलामेंट मिळेल. सेफ्टीसाठी यामध्ये दोन्ही बाजूला कॉम्बी ड्रम ब्रेक मिळतात. याच्या फ्रंट मध्ये टेलिस्कॉपिक और बॅक ला डुअलशॉक सस्पेंशन दिले आहे.
तुमच्या शहरात ई-लूना ची ऑन-रोड किंमत
शहर | व्हेरिएंट X1 | व्हेरिएंट X2 |
---|---|---|
मुंबई | 77,374 | 82,556 |
बेंगलोर | 77,874 | 83,056 |
दिल्ली | 78,174 | 83,356 |
पुणे | 77,374 | 82,556 |
नवी मुंबई | 77,374 | 82,556 |
हैदराबाद | 78,474 | 83,656 |
चेन्नई | 78,674 | 83,856 |
कोलकाता | 84,174 | 89,356 |
चंडीगढ | 77,674 | 82,856 |
ई-लूना (Kinetic E-Luna) ची लांबी 1.985 m, रुंदी 0.735 m, उंची 1.036 m आणि व्हीलबेस 1335 mm आहे. याच्या सीट ची हाइट 760 mm आणि कर्ब वेट 96 kg आहे. या इलेक्ट्रिक मोपेडचे एकूण वजन 96 किलो आहे. तर याच्या ग्राउंड क्लीयरन्स 170 mm आहे. सुरुवातीला 50 हजार ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असेल.