प्रतीक्षा संपली! स्वस्तात लाँच झाली नवीन इलेक्ट्रिक लूना, फक्त 2 हजारात घरी आणा

Kinetic Electric Luna Launched

Kinetic Electric Luna Launched: 50cc पेट्रोल मोटरने सुसज्ज असलेली Honda ची कायनेटिक लुना 70 ते 90 च्या दशकापर्यंत सर्वात लोकप्रिय दुचाकी वाहनांपैकी एक होती. एक काळ होता जेव्हा लुनाची दररोज 2,000 युनिट्सची विक्री नोंदवली जात असायची. मोपेड सेगमेंटमध्ये याची मार्केटमध्ये 95% हिस्सेदारी होती. हळू हळू याची डिमांड मार्केटमध्ये कमी झाली. जसजसे मार्केटमध्ये उत्तम इंजिन असलेल्या मायलेज बाईक्स आल्या तसेतसे हळू हळू लुना लुप्त होऊ लागली. चला तर याच्या डीटेल्स विस्ताराने जाणून घेऊया.

काय आहे किंमत?

जवळ जवळ दोन दशकानंतर लुना पुन्हा एकदा परत आली आहे. यावेळी हि लुना (Kinetic Electric Luna) इलेक्ट्रिक फॉरमॅटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्याला ई-लुना असे नाव दिले गेले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कायनेटिक ई-लुनाच्या लाँच प्रसंगी उपस्थिती दर्शवली. Kinetic e-Luna ची सुरुवातीची किंमत भारतीय मार्केटमध्ये 70,000 रुपयांपासून सुरू होते.

फायनांस आणि EMI उपलब्ध

लुना मागील वर्षीच्या पेट्रोल-मॉडेल लुनाच्या डिझाइनवर आधारित आहे. हि खूपच हलकी ईवी आहे. दैनंदिन जीवनासाठी डिझाइन केलेली ही एक उत्तम ईव्ही आहे. ई-लुना कामगिरीच्या बाबतीत ओजी लूना सारखीच आहे. ग्राहक हि 2,000 रुपयांच्या ईएमआई वर देखील खरेदी करू शकतात. ग्राहक 36 महिन्यांसाठी हि लुना फायनांस करू शकतात.

पेट्रोलवर चालणारी लुना 50cc इंजिनसोबत सहजपणे दोन व्यक्तींना घेऊन जाऊ शकते. हि रोडवर खूपच चपळ होती. ICE-बेस्ड लूनाचा वापर अवजड वस्तू नेण्यासाठी केला गेला आहे. ई-लूना कडून देखील अशी क्षमता यूएसपीची अपेक्षा केली जात आहे. ई-लूना 16 इंच व्हील्ससह येते. याचा ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे.

सिंगल चार्जमध्ये 110 किमी रेंज

ई-लुनामध्ये 2 kWh बॅटरी पॅक दिला आहे. कायनेटिक ई-लुना एका चार्जवर 110 किलोमीटरच्या रेंजचा दावा करते. याच्या टॉप स्पीड ताशी ५० किमी आहे. कायनेटिक ई-लुना एक आदर्श शहरी वाहन आहे. त्याचा पीक टॉर्क 22Nm आहे.

News Title: kinetic electric luna launched