Randeep Hooda Marriage: रणदीप हुड्डाने 350 वर्षे जुन्या मैतेई रिवाजानुसार केले लग्न, जाणून घ्या याची खासियत

Randeep Hooda Marriage: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम (Lin Laishram) विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाचे सुंदर फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही सेलिब्रिटींचा खास पोशाख आणि त्यांच्या लग्नाचे विधी. रणदीप हुड्डाने मणिपूरच्या अनोख्या मैतेई रिवाजानुसार लग्न केले. ज्याचा (Randeep Hooda Marriage) फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते देखील या लग्नाचे विधी आणि प्रथा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊयात असा असतो मैतेई रिवाज आणि काय आहे याची खासियत.

Randeep Hooda Marriage: 350 वर्षे जुनी प्रथा

रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी मैतेई रिवाजानुसार लग्न केले आहे, जो 350 वर्षे जुना आहे. मैतेई रीवाजामध्ये हार घातल्यानंतर वधू हात जोडून वराला नमस्ते करते. खास गोष्ट हि आहे कि तुळशीला साक्षी मानून हे लग्न केले जाते. त्याचबरोबर वधूचे वडील देखील वराची पूजा करतात. त्यानंतर वधूचे कुटुंब वधू आणि वर दोघांना भेटवस्तू किंवा पैसे देऊन शगुन देतात. कुटुंबातील इतर सदस्य देखील वधू-वरांचा वेगवेगळ्या प्रकारे आदर करतात.

विशेष पोशाख

मैतेई रीवाजामध्ये वधू वरांसाठी खास पोशाख तयार केला जातो. लग्नामध्ये वर पांढरे धोतर आणि कुर्ता परिधान करतो तर वधू पांढऱ्या सोनेरी रंगाचा सुंदर पोशाख परिधान करते. हा स्कर्ट बांबू आणि जाड फॅब्रिकपासून बनवला जातो. मैतेई विधीमध्ये वराला पांढऱ्या रंगाचा फेटा बांधला जातो, त्यावर गोल्डन रुंद गोटापट्टीने काम केले जाते. या गोलाईमध्ये डिझाईन केले जाते.

हेही वाचा
==> History of Arjan Vailly: कोण होते अर्जन वैली, ज्यांच्यावर सुपरहिट झाले ‘Animal’ चे गाणे

Leave a Comment