Panchak Title Song Out: पाच नक्षत्रांच्या एका विशिष्ट कालावधीला पंचक म्हंटले जाते. यामध्ये जे काही शुभ-अशुभ घडते ते पाच पतीने वाढते. याच संकल्पनेवर आधारित माधुरी दीक्षितचा पंचक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेणे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 5 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता चित्रपटाचे टायटल साँग निर्मात्यांनी रिलीज केले आहे.
Panchak टायटल साँग रिलीज
पंचक चित्रपटाचे टायटल साँग भीतीची बाराखडी रिलीज झाले आहे. एकदम वेगळी सुरुवात असणारे हे गाणे सुहास सावंत यांनी गायले आहे. गुरु ठाकूर यांनी त्याला शब्द दिले आहेत तर मंगेश धाकडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. गाणं जितकं ऐकायला जबरदस्त आहे तितकेच ते पाहायला देखील भन्नाट आहे.
Panchak चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर आणि गणेश मयेकर ह्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर प्रकाश वैद्य चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
माधुरी दीक्षित निर्मित पंचकच्या टायटल साँग मध्ये चार कलाकार शेतातून एकामागून एक धावताना दिसताहेत. त्यांच्या मागे कुत्रा देखील धावतो आहे. गाण्यच्या शेवटपर्यंत सर्व कलाकार धावतानाच दिसत आहेत. कधी गावातून तर कधी शेतामधून ते पळत आहेत. या गाण्याचे चित्रीकरण सलग दोन दिवस सुरु होते. दोन दिवस हे कलाकार सगळ्या गावामध्ये पळत होते असे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणाले.
हेही वाचा: अंगावर शहारे आणणारा सीन आणि मंत्र जापने भरलेली क्लिप, ‘हनुमान’ चा ट्रेलर रिलीज