Salman Khan Angry At Papps: सोहेल खानच्या पार्टीमध्ये पॅप्सवर भडकला सलमान खान, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan Angry At Papps: बॉलीवूडचा सुलतान सलमान खान त्याचा छोटा भाऊ सोहेल खानचा 53 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचला होता. यादरम्यान सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भाईजान पॅप्स ला पाहून खूपच भडकलेला दिसला.

पॅप्सवर भडकला सलमान खान – Salman Khan Angry At Papps

19 डिसेंबर म्हणजेच गेल्या दिवशी सोहेल खानने आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी त्याला विश करण्यासाठी त्याचा भाऊ सलमान खान कुटुंबासोबत पोहोचला होता. ज्यामध्ये सलीम खान, हेलेन, सलमा खान, अर्पिता खान आणि आयुष शर्मा, अलवीरा खान, अतुल अग्निहोत्री आणि त्याची मुलगी अलिज़ेह अग्निहोत्री आणि जवळचे मित्र सामील होते. बर्थडे विशनंतर भिजण आपल्या पॅरेंट्ससोबत वेन्युतून बाहेर पडताना दिसला. सलमानला पाहताच अनेक फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी त्याच्या जवळ गेले. हे पाहून सलमान खान खूपच भडकला (Salman Khan Angry At Papps) आणि कारमध्ये बसण्यापूर्वी पॅप्सकडे रागाने पाहत सगळे मागे हटा असे म्हणताना दिसला.

सलमान खानचा पॅप्सवर भडकतानाचा व्हिडीओ व्हायरल

पॅप्सवर भडकलेल्या सलमान खानचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर चांगला व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याला सपोर्ट केला आहे आणि म्हंटले आहे कि पॅप्सनी स्टार्सना इतका जास्त त्रास देऊ नये.

नुकतेच सलमान खानला मिळालेल्या धमक्यांमुळे त्याची सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे आणि अभिनेत्याला अलर्ट राहण्यास सांगितले गेले आहे. काही दिवसांपूर्वी गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानसोबतच्या कथित जवळीकीमुळे पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानाबाहेर गोळीबार केला होता.

सलमान खान वर्क फ्रंट

दरम्यान सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सलमान खान सध्या आपल्या लेटेस्ट रिलीज झालेल्या ‘टायगर 3’ च्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटामध्ये कॅटरीना कैफ आणि इमरान हाशमी यांनी देखील मुख्य भूमिका केल्या होत्या. चित्रपट मनीष शर्माने दिग्दर्शित केला होता तर आदित्य चोप्राने चित्रपटाची निर्मिती केली होती.

हेही वाचा: Salaar Advance Booking: सालारच्या अ‍ॅडवांस बुकिंगचे वादळ, बुक माय शो ची वेबसाईट झाली क्रॅश

Leave a Comment