Mahindra Atom Electric Car: भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये महिंद्रने देखील आपली क्युट आणि छोटी इलेक्ट्रिक कार Atom EV भारतीय मार्केटमध्ये उतरवली आहे. या कारचा लुक खूपच क्युट आहे आणि छोट्या साईजमुळे हि कार लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. चला तर या कारबद्दल (Mahindra Atom Electric Car) जाणून घेऊया.
कारचे शानदार फीचर्स
पॉवर स्टेअरिंग, पॉवर एसी, वन टच सेल्फ स्टार्ट, एयरबॅग, ट्यूबलेस टायर, मेटल एलॉय व्हील, डिजिटल इंडिकेटर, फॉग लाइट, एलईडी लाइट्स, हॅलोजन लाइट्स, टचस्क्रीन डिस्प्ले, बॅक डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिविटी, म्यूझिक सिस्टम या फीचर्ससोबत Mahindra Atom EV एक उत्तम इलेक्ट्रिक कार आहे.
दमदार बॅटरी आणि उत्तम रेंज
Mahindra Atom EV ही एक उत्तम बॅटरी आणि उत्तम रेंज असलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये दोन प्रकारचे बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. पहिली बॅटरी 7 kWh ची सुपर पॉवरफुल बॅटरी आहे. हि बॅटरी महिंद्रा ॲटम EV ला लाँग रेंज प्रदान करते. 7 kWh बॅटरी सोबत हि कार 120 किमीच्या रेंजसोबत येते.
दुसरी बॅटरी 11 kWh ची प्रीमियम बॅटरी आहे. हि एक शक्तिशाली बॅटरी पॅक आहे जी या कारला 200 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकतो. अशाप्रकारे महिंद्रा ॲटम EV ची बॅटरी क्षमता आणि आणि रेंज या छोट्या कारला लांबचे अंतर कापण्यास सक्षम बनवते. इतकी छोटी कार (Mahindra Atom Electric Car) असून देखील हि 120-200 किलोमीटर पर्यंतचा प्रवास सहज पूर्ण करू शकते.
शिवाय ॲटम EV चा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे जो शहरी प्रवासासाठी पुरेसाठी आहे. उत्तम रेंज आणि डिझाईनसोबत ॲटम EV भारतीय मार्केटमध्ये एक मजबूत इलेक्ट्रिक कार म्हणून उदयास येऊ शकते.
बजट फ्रेंडली इलेक्ट्रिक कार
Mahindra Atom EV हि एक अशी इलेक्ट्रिक कार आहे ज्याची किंमत परवडणारी ठेवण्यात आली आहे. हि एक बजट फ्रेंडली इलेक्ट्रिक कार (Mahindra Atom Electric Car) आहे जी प्रत्येकाला सहजपणे खरेदी करता येऊ शकते.
Mahindra Atom EV Price
Mahindra Atom EV ची एक्स-शोरूम किंमत फक्त 3 लाख रुपये आहे. हि किंमत मिडल कसं कुटुंबासाठी खूपच आकर्षक आणि किफायतशीर आहे. इतर इलेक्ट्रिक कार्सच्या तुलनेत Mahindra Atom EV ची किईम्त खूपच कमी आहे. हि भारतातील सर्वात स्वस्त कार्सपैकी एक कार आहे. महिंद्राने भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन हि कार आकर्षक किंमतीवर लॉन्च केली आहे.
Atom EV सारख्या परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारमुळे आता मध्यमवर्गीय कुटुंबांनाही इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आनंद घेता येईल. ही कार हळूहळू सामान्य लोकांमध्ये इलेक्ट्रिक कार लोकप्रिय होण्यास मदत करेल. अशाप्रक्रे Mahindra Atom EV आपल्या उत्तम डिझाईन, फीचर्स आणि सर्वात किफायतशीर किंमतीसोबत भारतीय मार्केटमध्ये एक मोठा बदल आणू शकते.