मोहम्मद शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा, म्हणाला; ‘सकाळी उठेन आणि निवृत्ती…’

Mohammed Shami on Retirement

Mohammed Shami on Retirement: भारतीय टीमचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या दुखापतीमुळे टीम इंडियामधून बाहेर आहे. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला शमी सध्या इंग्लंडविरुद्नच्या घरच्या कसोटी सिरीजमध्ये खेळत नाहीय. पण दरम्यान शमीने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य करून खळबळ उडवली आहे.

शमीने सांगितले कि तो कधी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्याने म्हंटले कि ज्या दिवशी मला वाटेल कि मी क्रिकेटमध्ये बोर होत आहे. त्यावेळी मी सकाळी उठून निवृत्तीबद्दल ट्विट करेन. शमीने नेटवर्क-18 ला दिलेल्या मुलाखती दरम्यान हे वक्तव्य केले आहे.

मला कोणी समजावणारा देखील नाही

मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना म्हंटले कि, मी ज्या दिवशी क्रिकेटपासून बोर होईन तेव्हा मी क्रिकेट सोडून देईन. मला कोणत्याही गोष्टीचा दबाव घेण्याची गरज नाही आणि मला समजावणारा देखील कोणी नाही आणि माझ्या कुटुंबामध्ये देखील मला कोणी काही म्हणत नाही. ज्या दिवशी मला सकाळी उठल्यानंतर वाटेल कि अरे यार मला ग्राउंडवर जावे लागणार आहे. त्या दिवशी मी स्वतः ट्वीट करेन कि मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.

आपल्या बायोपिक बद्दल काय म्हणाला शमी

अनेकवेळा शमीचा बायोपिक येणार असल्याच्या देखील बातम्या आल्या आहेत. तथ्पाई त्यामध्ये अभिनेता कोण असणार यावर खुलासा झालेला नाही. पण आता शमीने स्वतः आपल्या बायोपिकच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. त्याने म्हंटले कि, होय माझा बायोपिक येणार आहे. यामध्ये कोणताही अभिनेता नसेल तर मी क्रिकेट सोडल्यानंतर स्वतःच माझ्या बायोपिक मध्ये काम करेन.

कोहली आणि रोहितच्या फलंदाजीवर शमीची प्रतिक्रिया

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फलंदाजीवर देखील शमीने भाष्य केले. यावर तिने बिनधास्त उत्तरे दिली. शमी म्हणाला कि, विराट कोहली खूपच प्रेमाने शॉट्स खेळतो तर रोहित जेवढा वेळ खेळतो तो खूपच घाणेरडे आणि दूरवर मारतो.

शमीने म्हंटले कि, विराटपेक्षा रोहित जास्त खतरनाक फलंदाज आहे. कर्णधार म्हणून मला महेंद्र सिंह धोनी खास वाटतो, कारण त्याने 3-3 ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीसारखी कामगिरी आजपर्यंत कोणीही करू शकले नाही.n

News Title: mohammed shami on retirement interview

हेही वाचा: मोहम्मद शमीने असा साजरा केला भाचीचा चौथा वाढदिवस, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल