Mahindra XUV3e8: भारतीय मार्केटमध्ये महिंद्राने नुकतेच XUV400 Pro लाँच केली आहे. यानंतर आता कंपनीने भारतीय मार्केटसाठी नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणण्याची योजना बनवली आहे. अपकमिंग XUV3e8 ला नुकतेच भारतीय मार्केटमध्ये टेस्टिंग करताना स्पॉट केले गेले आहे. हि कर XUV700 ची टेस्टिंग म्यूल इलेक्ट्रिक व्हेरियंट मानले जाऊ शकते. हि कार नुकतेच महिंद्राच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये स्पॉट झाली आहे. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Mahindra XUV3e8 प्रोटोटाइप
याच्या टीझरवर असे पाहायला मिळते कि महिंद्राने सादर केलेल्या Mahindra XUV3e8 प्रोटोटाइपसारखे दिसते. पण कारचे अलॉय व्हील नवीन आहेत. कारला एरोडायनॅमिक बनवण्यासाठी डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत. या इमेजमध्ये एसयूव्हीचा मागील भाग दिसत नाही. त्याच्या बंपरचे पूर्णपणे नवीन डिझाइन देण्यात आले आहे. यात नवीन एअर डॅम आणि हेडलॅम्पसाठी व्होल आहेत.
INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित पहिली EV
XUV.e8 न्यू INGLO प्लॅटफॉर्मवर वर बेस्ड पहिली इलेक्ट्रिक व्हेहिकल असणार आहे. याची लांबी, रुंदी आणि उंची 4,740mm, 1,900mm आणि 1,760mm असणार आहे. याचा व्हीलबेस 2,762mm असेल. Mahindra XUV.e8 डिसेंबर 2024 मध्ये लाँच होणार आहे.
व्हेहीकल टू लोड टेक्नोलॉजीने असणार सुसज्ज
हे प्लॅटफॉर्म दोन प्रकारच्या बॅटरी पॅकचे ब्लेड आणि प्रिझमॅटिक ला सपोर्ट करते. बॅटरी पॅकबद्दल बोलायचे झाले तर हि 60-80 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येईल. हि 175 kW च्या दराने जलद चार्जिंग करण्यास सक्षम असेल. शिवाय बॅटरी 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 80 टक्के वेगाने चार्ज होऊ शकते. महिंद्रा यामध्ये व्हेहिकल टू लोड (V2L) टेक देखील देणार आहे, याचा अर्थ असा आहे कि या इलेक्ट्रिक वाहनाने इतर इलेक्ट्रिक व्हेहिकल गॅझेट चार्ज केले जाऊ शकतात.
हेही वाचा: रतन टाटांचा मोठा धमाका, नॅनो पुन्हा येणार बाजारात, जाणून घ्या एका चार्जमध्ये किती देणार रेंज