Two Wheeler CNG Kit: देशाच्या अनेक शहरांमध्ये CNG स्कूटर धावत आहेत. तुम्ही विचार करत असाल कि जर CNG स्कूटर कोणत्याही कंपनीने लाँच केलेली नाही तर मग हि मार्केटमध्ये कुठून मिळते. वास्तविक स्कूटरमध्ये CNG किट (Two Wheeler CNG Kit) लावून हे कम केले जाते. सध्या पेट्रोलची किंमत जवळ जवळ 110 रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे.
तर Activa, Jupiter, Maestro सारख्या स्कूटरचे मायलेज जवळ जवळ 40 ते 45 किमी प्रति लिटर आहे. यामुळे या स्कूटर चालवणे सामान्य माणसांसाठी महागाचे ठरते. यामुळेच आता अनेक कंपन्या स्कूटरस्तही CNG किट घेऊन आल्या आहेत. या किटच्या मदतीने स्कूटर चालवण्याचा खर्च फक्त 70 पैसे प्रति किलोमीटर इतका होतो. सध्या बजाज ऑटो देशातील पहिली CNG वर चालणाऱ्या मोटरसायकलवर काम करत आहे.
स्कूटरमध्ये बसवावे लागेल CNG किट (Two Wheeler CNG Kit)
तुमच्या जवळ Honda Activa, TVS Jupiter, Hero Maestro, Suzuki Access किंवा इतर कोणतीही स्कूटर असेल तर याचे मायलेज वाढवण्यासाठी CNG किट लावावे लागेल. दिल्ली स्थित CNG किट मेकर कंपनी LOVATO स्कूटरमध्ये हे किट (Two Wheeler CNG Kit) लावू शकते. याचा करच जवळ जवळ 18 हजार रुपये इतका आहे. कंपनीने दावा केला आहे कि हा खर्च तुम्ही एक वर्षापेक्षा कमी कालवधीत वसूल करू शकता, कारण CNG आणि पेट्रोलच्या किंमतींमध्ये सध्या 40 रुपयांचा अंतर आहे.
पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालणार स्कूटर
स्कूटरमध्ये CNG किट (Two Wheeler CNG Kit) इन्स्टॉल करण्यासाठी जवळ जवळ 4 तासांचा वेळ लागतो, पण तुम्ही ती पेट्रोलवर देखील चालवू शकता. यासाठी कंपनी एक स्वीच लावते. ज्याद्वारे CNG मोड वरून पेट्रोल मोड वर येते. कंपनी यामध्ये पुढच्या बाजूला दोन सिलेंडर देते, ज्याला ब्लॅक प्लास्टिकने कव्हर केले जाते. तर सीतच्या खालच्या भागामध्ये याला ऑपरेट करणारी मशीन फिट केली जाते. म्हणजे Activa ला CNG आणि पेट्रोल दोन्हीवर चालवले जाऊ शकते. Activa वर CNG संबंधित काही ग्राफिक्स देखील दिली जातात.
CNG किट लावण्याचे तोटे देखील
CNG किट लावण्याचे तोटे देखील आहेत. पहिला हा आहे कि या किटमध्ये जे सिलेंडर लावले जाते ते फक्त 1.2 किलोच CNG स्टोरेज करू शकते. अशामध्ये 120 ते 130 किलोमीटर नंतर तुम्हाला पुन्हा CNG ची गरज पडते. तर CNG स्टेशन सहजपणे मिळत नाहीत. तुमच्या लोकेशनपासून हे 10-15 किलोमीटर लांब असू शकते. सीएनजीमुळे स्कूटरचे मायलेज वाढत असले तरी ते वाहनाला पिकअप देत नाही. अशा परिस्थितीत, यामुळे चढ-उतारावर वाहनाच्या इंजिनवर लोड येऊ शकतो.
हेही वाचा: पेट्रोलची चिंता मिटली ! अवघ्या 18,330 रुपयात जुन्या Activa ला बनवा इलेक्ट्रिक स्कूटर