सर्वांच्या बजटमध्ये लाँच होणार Moto G34 5G फोन, अवघ्या 11 हजारमध्ये मिळणार 128GB मॉडल

मोटोरोला 9 जानेवारी रोजी भारतामध्ये Moto G34 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतामध्ये या फोनची विक्री ऑफिशियल साईटशिवाय फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाणार आहे. हा मोटोचा एक बजट स्मार्टफोन असेल. फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या साईटवर फोनची डेडिकेटेड माइक्रोसाइट लाइव झाली आहे, ज्यामुळे फोनचे काही स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. जर तुम्ही देखील हा स्वस्त 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि एक चांगली बातमी आहे. लाँचच्या अगोदर फोनची किंमत समोर आली आहे.

भारतामध्ये इतकी असेल Moto G34 5G ची किंमत

91Mobiles ने या किंमतीचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार भारतामध्ये Moto G34 5G ची किंमत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 10,999 रुपयांपासून सुरू होईल. या डीटेल्स सोर्समधून मिळाल्या आहेत. मोटोरोला फोनच्या 8GB रॅमचे देखील मॉडेल लाँच केले जाणार आहे, ज्याची किंमत बेस मॉडेलपेक्षा जास्त असेल.

Moto G34 5G चे बेसिक स्पेसिफिकेशन Moto G34 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स आधीच समोर आले आहेत. कारण फोन कंपनीच्या वेबसाईटवर लिस्टेड आहे. लिस्टिंग नुसार यामध्ये 6.5 इंचचा डिस्प्ले असेल, जो एचडी प्लस रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज असेल, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असेल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील उपलब्ध असेल.

Moto G34 5G

बॅटरी

सॉफ्टवेअरच्या बाबतीत फोन आउट ऑफ द बॉक्स Android 13 वर चालेल. मोटोरोलाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर पुष्टी केल्यानुसार फोनला Android सॉफ्टवेअर अपडेट देखील मिळेल. फोटोग्राफीसाठी, Moto G34 मध्ये 50-मेगापिक्सेल ड्युअल-कॅमेरा सेटअप, 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, स्टेरिओ स्पीकर्स, 3.5mm ऑडिओ जॅक, IP52 रेटिंग, 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

हेही वाचा: 200MP कॅमेऱ्यासह एन्ट्री घेणार Nokia चा हा जबरदस्त स्मार्टफोन, iPhone ला देणार तगडी टक्कर