New Cast of Anupamaa: अनुपमा टीव्ही सिरीयलचा लीप वाला मुमेंट जवळ आला आहे आणि स्टोरीमध्ये आता जुन्या पत्रांचा स्क्रीन टाईम कमी करून काही नवीन अभिनेत्यांना आणले जाणार आहे. अनुपमाचा शहा आणि कपाडिया यांच्या घरामधून भ्रमनिरास झाल्यानंतर ती एकटी राहण्यास सुरुवात करेल आणि त्यानंतर देविका तिला अमेरिकेला जाण्यास मदत करेल. अनुपमा अमेरिकेला गेल्यानंतर एक पूर्णपणे नवीन स्टोरी सुरु होईल ज्यामध्ये अनेक नवीन पात्रांची एंट्री होईल. अनुच्या आयुष्यामध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री होईल आणि #MaAn जोडीचा कायमचा अंत होईल असा अंदाज लावला जात आहे.
अनुपमामध्ये होणार YRKKH स्टारची एंट्री! – New Cast of Anupamaa
माहितीनुसार YRKKH च्या स्टार कास्टचा भाग असलेला अभिनेता सचिन त्यागी अनुपमा सिरीयलमध्ये महत्वाची भूमिका करताना दिसणार आहे. (New Cast of Anupamaa) अनुपमा अमेरिकेला पोहोचल्यानंतर सचिन त्यागीची भूमिका अनुपमासाठी एक महत्वाचा सपोर्ट म्हणून काम करेल. अनुपमाअमेरिकेमध्ये काही अशा भारतीयांना भेटेल जे तिला पुन्हा जगण्याचा धीर देतील.
अनुपमाला मिळणार नवा जोडीदार?
माहितीनुसार सचिन त्यागीची भूमिका खूपच खास असणार आहे, पण स्तोरीम्ध्ये ती पुढे जाईल का नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तो स्वतः अनुपमाचा जोडीदार बनणार का, अनुज कपाडियाला पुन्हा तिच्या लाईफमध्ये परत आणण्यासाठी मदत करणार? हे प्रश्न आता सिरीयलच्या पुढच्या भागामध्येच सुटतील.
मोठी झालेल्या अनुची भूमिका करणार हि अभिनेत्री
सचिन त्यागी शिवाय अनुपमा सिरीयलमध्ये अनेक नवीन भूमिकांची एंट्री होणार असल्याचे म्हंटले जात आहे. रिपोर्टनुसार सचिन त्यागीशिवाय ‘मैं हूं अपराजिता’ मध्ये श्वेता तिवारीची को-स्टार राहिलेली प्रिंसी प्रजापति देखील या सिरीयलचा भाग बनणार आहे. इतकेच नाही तर औरा भटनागर देखील या सिरीयलमध्ये एंट्री करू शकते, ज्यानंतर असा अंदाज लावला जात आहे कि ती मोठी झालेल्या अनुची भूमिका करेल.