New Mahindra Thar 5-Door: महिंद्रा लवकरच भारतामध्ये नवीन 5 डोरची थार एसयूवी लॉन्च करणार आहे. ज्याची टेस्टिंग सध्या सुरु आहे. या आगामी 5-डोर थारचा हार्ड टॉप वेरिएंट पाहायला मिळाला आहे, जो दिसायला खूपच जबरदस्त आहे. भारतीय मार्केटमध्ये ग्राहक याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि लॉन्च होताच हि मारुती सुजुकी आणि आगामी फोर्स गुरखा 5-डोरला टक्कर देणार. नुकतेच समोर आलेल्या स्पाय फोटोजमध्ये नवीन थार 5-डोर मध्ये मोठ्या साईजचा इंफोटेनमेंट डिस्प्ले पाहायला मिळत आहे. ही नवीन SUV लांब व्हीलबेसवर तयार केली जात आहे ज्यामुळे केबिनमध्ये तिसऱ्या रांगेसाठी पुरेशी जागा मिळेल
New Mahindra Thar 5-Door मध्ये स्वस्त वेरिएंट मिळणार
नुकतेच नवीन महिंद्र थार 5-डोर (New Mahindra Thar 5-Door) ला टेस्टिंग दरम्यान पाहिले गेले आहे आणि अशी अपेक्षा आहे कि कंपनी यासोबत रियर-व्हील ड्राइव पर्याय देईल. हे वेरिएंट थार 5-डोरचे सर्वात स्वस्त मॉडेल असेल. रिपोर्टमध्ये हा दावा केला गेला आहे कि नवीन थार 5-डोर स्कॉर्पियो एन वाल्या मजबूत प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे. कंपनी आगामी ऑफ-रोडरच्या लांबीनुसार यामध्ये बदल करणार आहे. नवीन एसयूवीच्या मागच्या बाजूला सामान पेंटालिंक सस्पेंशन मिळणार आहे. तथापि स्कॉर्पियो एनच्या तुलनेत नवीन महिंद्रा थार साईजमध्ये छोटी असेल.
नवीन थारला मिळणार दोन इंजिन पर्याय
5 डोर असणारी नवीन थारसोबत महिंद्र दोन इंजिन पर्याय ऑफर करेल, ज्यामध्ये पहिला 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि दूसरा टर्बो डीजल इंजन आहे. हे तेच इंजिन आहे जे सध्याच्या मॉडेलसोबत मिळते, तथापि 5-डोर थारमध्ये हे दोन इंजिन जास्त दमदार होऊ शकतात. इथे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स येथे उपलब्ध असतील. भारतात याच्यासोबत स्पर्धत करण्यासाठी आणखी दोन SUV येत आहेत, त्यापैकी 5-डोर मारुती सुझुकी जिमनी लाँच करण्यात आली आहे, तर 5-डोर फोर्स गुरखा लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
Mahindra Thar 5 Door Side Profile Detailed – New Spy Shots https://t.co/voiiAuUXOq pic.twitter.com/qDs7TAPXtL
— RushLane (@rushlane) November 5, 2022
Also Read
==> Upcoming Maruti Cars: 2024 मध्ये मारुती लाँच करणार या 4 कार्स