Upcoming Maruti Cars: आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुजुकीने ग्रँड विटारा आणि 5-डोर जिमनी लॉन्च करून एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. हाच क्रम पुढे चालू ठेवत कंपनी पुढील वर्षी 2024 मध्ये आपला पोर्टफोलिओ आणखी वाढवणार आहे. यासाठी मारुती 2024 मध्ये 4 नवीन कार मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. चला तर या आगामी कार्सबद्दल जाणून घेऊया.
Upcoming Maruti Cars – New 3-Row SUV
येणाऱ्या नवीन कार्स (Upcoming Maruti Cars) मध्ये एक 7-सीटर प्रीमियम SUV देखील सामील आहे. मारुती सुझुकीने अद्याप या कारची लॉन्च डेट जहीर केलेली नाही, पण इंडस्ट्रीमधील अहवालानुसार असे समोर आले आहे कि 2024 च्या दुसऱ्या उत्तरार्धात लॉन्च केली जाईल. हे नवीन मॉडेल ग्रँड विटारा एसयूवीशी इंस्पायर्ड असेल. याचा प्लॅटफॉर्म, फीचर्स आणि पॉवरट्रेन देखील सध्याच्या SUV प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे. नवीन 7-सीटर SUV 1.5L K15C आणि 1.5L Atkinson सायकल स्ट्रॉन्ग हायब्रिड पावरट्रेनच्या निवडीसहा उपलब्ध असेल. या SUV ची निर्मिती खरखोडा येथील नवीन प्लांटमध्ये केली जाईल.
मारुती EVX इलेक्ट्रिक SUV
भारतीय मार्केटसाठी मारुती आपली पहिली इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे. हि इलेक्ट्रिक एसयूवी eVX कॉन्सेप्टने इंस्पायर्ड आहे, ज्याचा प्रोटोटाइप 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर केला गेले आहोत. नवीन स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित, या इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी अंदाजे 4.3 मीटर आहे. 2024 मध्ये हि कर फेस्टिवल सीजनमध्ये लॉन्च केली जाईल. मारुती सुझुकी गुजरातमधील प्लांटमध्ये या कारची निर्मिती करणार आहे.
New-Gen Swift and Dzire
आपल्या SUV लाइनअप व्यतिरिक्त, मारुती सुझुकी न्यू जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर सब-कॉम्पॅक्ट सेडान देखील सादर करणार आहे. या कर अनुक्रमे फेब्रुवारी आणि एप्रिल 2024 मध्ये मार्केटमध्ये दाखल होतील. दोन्ही कार्सन सीवीटी गियरबॉक्स सोबत कंपनीचे लेटेस्ट 1.2L, 3-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये एक हायब्रिड पावरट्रेनचा देखील पर्याय देण्यात येणार आहे. सध्याच्या मॉडेलपेक्षा यामध्ये खूप जास्त मायलेज मिळण्याची अपेक्षा आहे.
Also Read