27 वर्षाचे करियर सोडून संन्यासी बनली हि अभिनेत्री, म्हणाली; ‘सर्व काही मोह माया…’

Nupur Alankar In Spirituality: टीव्ही जगतातील अनेक कलाकार असे राहिले आहेत ज्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. या लिस्टमध्ये अनघा भोसले पासून सना खान पर्यंतचे नाव सामील आहे. या मार्गावर ‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्रीने देखील पाऊल टाकले. जिने 27 वर्षाचे करियर एका क्षणामध्ये सोडून अध्यात्माचा मार्गावर जाण्याच्या निर्णय घेतला. (Nupur Alankar In Spirituality) इतकेच नाही नुपूर अलंकारने आपल्या करियरसोबत आपले कुटुंब आणि पतीला देखील सोडले.

टीव्ही अभिनेत्री म्हणून सुरु केले करियर

नुपूर अलंकारने आपल्या करियरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केले होते. तिने ‘भागे रे मन’, ‘सावरिया’, ‘दीया और बाती हम’ आणि ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ सारख्या टीव्ही शोमध्ये कम केले. बातमीनुसार ती एकूण 157 प्रोजेक्ट्समध्ये पाहायला मिळाली आहे. नुपूर अलंकारने सांगितले होते कि तिने तिचा सन्यास घेण्याचा निर्णय तिच्या पतीला देखील मान्य होता.

अभिनेत्रीचा पती आणि तिच्या कुटुंबाने तिला सर्व गोष्टीमधून मुक्त केले. नुपूरने सांगितले होते कि तिने वेगळे होण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडला नाही. त्याचबरोबर आज देखील ती तिच्या पतीच्या सुखासाठी प्रार्थना करते.

2022 मध्ये घेतला होता सन्यास

नुपूर अलंकारने 2022 मध्ये अधिकृतपणे घोषणा केली होती कि ती सर्वकाही सोडून सन्यास (Nupur Alankar In Spirituality) घेत आहे. यानंतरच नुपूर अलंकारला भगव्या वस्त्रामध्ये पाहिले गेले होते. टीव्ही सिरीयलशिवाय नुपूर अलंकारने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये कम केले आहे. ज्यामध्ये सावरिया, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता आणि रेत सारखे चित्रपट आहेत.

यामुळे घेतला मोठा निर्णय

नुपूर अलंकार ने सांगितले होते कि, लोकांना वाटते ती जीवनाला कंटाळून सन्यासाला (Nupur Alankar In Spirituality) गेली आहे. पण असे काही नाही. नुपूरचे म्हणणे होते कि तिला अध्यात्माच्या मार्गावर जायचे होते, त्याचबरोबर या दिशेमध्ये तिला आणखी नवीन काही शोधायचे होते. नुपूर अलंकार तसे तर नेहमी चर्चेमध्ये राहते.

नुपूरला बृजच्या गल्ल्याम्ध्ये भिक्षा मागताना देखील पाहिले गेले होते, ज्यानंतर तिला पाहून लोक हैराण झाले होते. तथापि नुपूरने स्वतःदेखील जाहीर केले होते कि ती भिक्षा मागून जीवन जगते. नुपूर अलंकारने गेल्या वर्षी सोशल मिडियावर शेवटची पोस्ट केली होती. तिने सांगितले होते कि ती हिमाचलमध्ये पोहोचली आहे आणि इथे तिचा अज्ञात प्रवास सुरु होत आहे.

News Title: nupur alankar in spirituality