Surbhi Chandna Wedding: ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री सुरभि चंदना अडकणार विवाह बंधनात, बॉयफ्रेंडसोबत घेणार सात फेरे

Surbhi Chandna Wedding: लग्नाच्या या सीजनमध्ये अनेक टीव्ही आणि बॉलीवूड कलाकार आपल्या पार्टनरसोबत सात फेरे घेऊन विवाहबंधनात अडकत आहेत. आमीर खानची मुलगी इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे लवकरच विवाहबंधंत (Surbhi Chandna Wedding) अडकणार आहेत. अशामध्ये आता टीव्ही अभिनेत्री सुरभि चंदना (Surbhi Chandna) देखील विवाहबंधनात अडकणार आहे. यानंतर तिचे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.

13 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये सुरभि आणि करण (Surbhi Chandna Wedding)

नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार सुरभि बऱ्याच काळापासून बिजनेसमन करण शर्माला (surbhi chandna husband) डेट करत आहे. आता दोघांनी आपल्या नात्याला लग्नाचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हंटले जाता हे कि सुरभि आणि करण गेल्या 13 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बातमीनुसार आता कपल याच वर्षी मार्च महिन्यामध्ये विवाहबंधनात (Surbhi Chandna Wedding) अडकू शकतात. अजूनपर्यंत सुरभिकडून यावर अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

2022 मध्ये ऑफिशियल केले होते रिलेशन

मिडिया रिपोर्टनुसार सुरभि आणि करणची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे पार्टीमध्ये झाली होती. यानंतर दोघे एकत्र आहेत. तथापि बराच काळ सुरभिने आपले रिलेशन मिडियापासून लपवून ठेवले, पण 2022 मध्ये त्यावेळी रिलेशनशिप समोर आले जेव्हा अभिनेत्रीने 9 सप्टेंबर रोजी एका पोस्टमध्ये करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होता.

सुरभि चंदना टीव्ही करियर

सुरभि चंदना ने आपल्या करियरची सुरुवात सब टीव्हीचा लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधून 2009 मध्ये केली होती. या शोनंतर सुरभि अनेक शोमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाली. पण अभिनेत्रीला खरी ओळख इश्कबाज मधून मिळाली. या शोमध्ये तिने अनिका शिवाय सिंह ओबेरॉय ची भूमिका केली होती. शिवाय सुरभि संजीवनी, नागिन 5, शेरदिल शेरगिल सारख्या शोजमध्ये देखील काम करताना पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा: Ira Khan Wedding: आमिर खानची मुलगी इरा खान बनणार नुपूर शिखरेची नववधू, फोटो व्हायरल