साखरपुड्यात प्रथमेश परबचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

Prathamesh Parab Engagement: टाईमपास फेम दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबत तो लवकरच एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. नुकतेच 14 फेब्रुवारी व्हेलेंटाईन डेच्या दिवशी दोघांनी साखरपुडा उरकला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

व्हिडीओ व्हायरल

प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या साखरपुड्यातील (Prathamesh Parab Engagement) व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओमध्ये प्रथमेश बायकोसाठी शाहरुख खानच्या गाण्यावर डांस करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ अभिनेता प्रथमेश परबने स्वतः त्याच्या अकाऊंटवरून शेयर केला आहे.

“खऱ्या आयुष्यात थोडं फिल्मी होणं गरजेचं आहे,” असं कॅप्शन देत त्याने व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रथमेश शाहरुख खान आणि काजोलच्या दिलवाले चित्रपटामधील ‘गेरुआ’ गाण्यावर डांस करताना दिसत आहे. प्रथमेशच्या या डांस व्हिडीओवर त्याच्या बायकोने देखील कमेंट केली आहे. “तुझ्या प्रेमात वेडेपणा”, अशी कमेंट क्षितिजाने कमेंट केली आहे.

Prathamesh Parab Engagement

कोण आहे क्षितिजा घोसाळकर

प्रथमेशची होणारी बायको क्षितिजा घोसाळकर हि एक फॅशन मॉडेल आहे. त्याचबरोबर ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करायला आवडते. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची होणारी बायको पाहायला मिळाली होती.

News Title: prathamesh parab engagement video